शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

मनोहर चिंतामण कुलकर्णी यांना पुणे मनपाचा बालगंधर्व पुरस्कार

By admin | Updated: June 13, 2017 21:40 IST

महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा बालगंधर्व पुरस्कार ज्येष्ठ नाट्यव्यवस्थापक मनोहर चिंतामण कुलकर्णी ( अण्णा) यांना जाहीर

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 13 - महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा बालगंधर्व पुरस्कार ज्येष्ठ नाट्यव्यवस्थापक मनोहर चिंतामण कुलकर्णी ( अण्णा) यांना जाहीर झाला आहे. याशिवाय विठ्ठल हुलावळे (नेपथ्यकार), यश रूईकर ( पुरूषोत्तम करंडक विजेते), चंद्रशेखर देशपांडे ( आॅर्गनवादक), अस्मिता चिंचाळकर ( अभिनेत्री व गायिका) आणि दत्तात्रय शिंदे ( सेटिंग) यांना बालगंधर्वविशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत.बालगंधर्व पुरस्काराची निवड करण्यासाठी मंगळवारी महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये या पुरस्कारांची निवड करण्यात आली. या निवड समितीत अनुराधा राजहंस, डॉ. सतीश देसाई, शुभांगी दामले, उस्ताद फैय्याज हुसेन खान यांचा समावेश होता. येत्या 26 जून रोजी बालगंधर्व पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. मनोरंजन नाट्यसंस्थेचे संस्थापक-संचालक मनोहर कुलकर्णी यांनी जवळपास पन्नास वर्षे नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. लग्नाची बेडी, पराचा कावळा, उद्याचा संसार, घराबाहेर, तुझ आहे तुझपाशी, अश्रूंची झाली फुले, भावबंधन आदी विविध नाटकांसह जावई माझा भला  आणि  पांडू हवालदार  या मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसाउमटविला. शहरात नाट्यगृहांची उभारणी झाल्यानंतर नाट्य प्रयोग, आॅर्केस्ट्रा, संगीत आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी लिलया पार पाडली. 1970 मध्ये मनोरंजन नाट्यसंस्थेची स्थापना करून सांस्कृतिक क्षेत्रात व्यवस्थापनामध्ये ही संस्था त्यांनी नावारूपाला आणली. सांस्कृतिक कारकिर्दीत नाट्यदर्पण पुरस्कार, कलागौरव प्रतिष्ठानचा नाट्यगौरव पुरस्कार यांसह नाट्यसृष्टीतील पन्नास वर्षाच्या कामगिरीबददल राज्याच्या सांस्कृतिक विभागातर्फे त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ह्यह्य आजवर बालगंधर्व पुरस्कारासाठी इतरांचीच नावे सुचवत होतो मात्र हापुरस्कार मला मिळेल असे कधी वाटले नाही. कारण मी अभिनेता नाही. आजवरनाटकामध्ये ज्या काही भूमिका केल्या त्या हौसेपोटी केल्या. पणपुरस्काराचा आनंद नक्कीच आहे. - मनोहर कुलकर्णी ( अण्णा)