शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट! ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा, ‘एकनाथां’चा सोडला हात
2
आजचे राशीभविष्य : बुधवार ७ जानेवारी २०२६; आजचा दिवस शुभ फलदायी, विविध स्तरांवर लाभ संभवतात
3
जि.प. निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात? १२ जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात
4
मुंबईची निवडणूक ठरविणार ‘ठाकरे ब्रँड’चे भवितव्य; उद्धव यांच्यासमोर दुहेरी आव्हान अन् कसोटी
5
प्रचाराला ‘बिन’विरोधाची धार, दादांवर ‘सिंचन’वरून प्रहार; राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात जुंपली
6
“विलासराव देशमुख यांच्या आठवणी कोणीही पुसू शकत नाही”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
सभेसाठी मैदान दिले जात नाही: संजय राऊतांचा दावा; ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर एकच मोठी सभा
8
मराठी टक्का वाढवण्यास ठोस आराखडा आहे का? गेली २० वर्षे ज्यांची सत्ता होती…: प्रकाश आंबेडकर
9
जनतेचे प्रश्न सोडवण्याचा दावा करणाऱ्या नेत्यांनाच प्रचारसभांसाठी मैदान मिळेना...!
10
राहुल नार्वेकरांच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज नाकारल्याचा आरोप; ८ उमेदवार हायकोर्टात
11
एमसीए निवडणुकीसाठी दोन महिन्यांत ४०० सभासदांची नोंदणी झाली कशी?
12
जेम्स लेनच्या पुस्तकातील शिवरायांवरील अवमानकारक लिखाणाबाबत २२ वर्षांनी ऑक्सफर्डने मागितली माफी
13
एमआयएमला अध्यक्ष नसला तरी फरक पडत नसल्याचा दावा; जागावाटपावरून मतभेद अन् राजीनामा
14
सोनिया गांधी यांना श्वसनाचा त्रास, रुग्णालयात दाखल
15
महामार्गांवरील प्रवासादरम्यानचा ‘नो नेटवर्क’चा त्रास आता संपणार
16
कुणाच्या शिव्यांनी फरक पडत नाही, मला विष प्यायची सवय; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
17
सभांऐवजी शाखा भेटींवर भर, ठाकरे बंधूंची हटके रणनीती; 'शिवतीर्था'वर ११ तारखेला उद्धव-राज गर्जना
18
VIDEO: बॉलीवूड अभिनेत्री संतापली! प्रचार रॅलीतील फटाक्यांमुळे घराला आग, कार्यकर्त्यांना सुनावलं
19
अपक्ष उमेदवार तेजल पवार यांचा राहुल नार्वेकरांवर धक्कादायक आरोप; 'बिनविरोध'साठी घडला थरार?
20
"हिंदुत्व विरोधी काँग्रेसची भाजपानं घेतली साथ, आता महापालिकेत परिणाम भोगा" शिंदेसेना संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समिती बनवणार - मंगलप्रभात लोढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 21:04 IST

पुढील १ महिन्याच्या आत महिला व बालविकास विभागाची मोठी बैठक आदिवासी भागात घेऊन तेथील समस्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न करू असंही महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत म्हटलं.

मुंबई - बालमृत्यूमागे कुपोषण एक कारण असू शकते. कुपोषण ही मोठी समस्या केवळ राज्यात नाही तर देशभरात आहे. कुपोषणामुळे मृत्यू नाही हे नाकारू शकत नाही. जिल्हास्तरावर आदिवासी विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला आणि बाल विकास विभाग, अन्न व औषध प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची समन्वय समिती बनवू अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत केली. 

कुपोषणाच्या मुद्द्यावर मंगलप्रभात लोढा म्हणाले की, कुपोषण ही गंभीर समस्या आहे. याबाबत जिल्हास्तरावर समन्वयाचा अभाव असल्याची तक्रार अनेक सदस्यांनी सभागृहात केली. त्यावर लवकरच जिल्हास्तरीय शासनाच्या विभागांशी, लोकप्रतिनिधींशी समन्वय समिती बनवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर ठेवला जाईल. जेणेकरून विभागांच्या योजनांचा कुपोषित बालकांपर्यंत लाभ पोहचेल यासाठी ही समिती काम करेल असं त्यांनी म्हटलं. 

तसेच पुढील १ महिन्याच्या आत महिला व बालविकास विभागाची मोठी बैठक आदिवासी विकास विभागासोबत घेऊन समस्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न करू असंही महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत म्हटलं. कुपोषणाच्या मुद्द्यावर सभागृहात विरोधकांनी सरकारला आक्रमकपणे धारेवर धरले. आदिवासी विभागाच्या मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने विरोधकांनी या प्रश्नावर सभात्यागही केला होता. 

प्रश्न राखून ठेवण्याची मागणी  राज्यात कुपोषित बालकांचा मृत्यू होत असताना आदिवासी विकास मंत्री योग्य उत्तर देत नाही. ते आरोग्यमंत्र्यांकडे बोट दाखवत आहेत. परंतु आरोग्य मंत्र्यांकडेही त्याचे उत्तर नाही. सभागृहात योग्य उत्तर मिळत नाही तोवर आमचे समाधान होणार नाही. त्यामुळे हा प्रश्न राखून ठेवावा अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केली. परंतु त्यानंतर प्रश्न रेटून नेण्याचा प्रयत्न केला असता विरोधकांनी गोंधळ घालत सभात्याग केला. 

टॅग्स :Mangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढा