शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींना मिळालेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिकृतीसाठी मंगलप्रभात लोढांनी लावली 51 लाखांची बोली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 19:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या 1300 भेटवस्तुंचा ई-लिलाव होत आहे.

मुंबई:काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. त्या दौऱ्यात पंतप्रधानांना अनेकांनी मौल्यवान भेटवस्तू दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा त्यांना मिळालेल्या भेटवस्तुंचा लिलाव केला आहे. आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तुंचा लिलाव होत आहे.

Https://pmmementos.gov.in या वेब पोर्टलवर 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2021 पर्यंत नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव होत आहे. या लिलावात टोकियो 2020 पॅरालिम्पिक गेम्स आणि टोकियो 2020 ऑलिम्पिक गेम्सच्या विजेत्यांनी पंतप्रधानांना दिलेली क्रीडा उपकरणे आणि आणि इतर भेटवस्तुंचा समावेश आहे. यासय, विविध कलाकृतींमध्ये अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती, चारधाम, रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर, मॉडेल, शिल्प, चित्रे यांचा समावेश आहे. ई-लिलावाच्या या टप्प्यात सुमारे 1330 स्मृतिचिन्हे ई-लिलाव केली जात आहेत.

मंगलप्रभात लोढांनी लावली 51 लाखांची बोलीया लिलावात भाग घेत मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांनी अयोध्या राम मंदिराच्या प्रतिकृतीसाठी 51 लाख रुपयांची बोली लावली आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक बोली आहे. लांबी - 68 (सेमी), रुंदी - 52 (सेमी), उंची - 53 (सेमी) आणि वजन - 23 (किलो) असलेली अयोध्या राम मंदिराची ही प्रतिकृती लाकडापासून बनलेली आहे. याबाबत बोलताना मंगलप्रभात लोढा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्वांना ई-लिलावाद्वारे देशाच्या सेवेत योगदान देण्याची आणखी एक संधी दिली आहे, त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढाRam Chandra Avasareरामचंद्र अवसरे