शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

मंगलगाण्यांत दंग झाल्या सखी

By admin | Updated: January 18, 2015 01:29 IST

महाराष्ट्राच्या संस्कृतीशी समरस झालेल्या लोककला, लोकगीते, नृत्य यांचा अविष्कार ‘मंगलगाणी-दंगलगाणी’ या कार्यक्रमातून सादर झाला. ‘

पुणे : महाराष्ट्राच्या संस्कृतीशी समरस झालेल्या लोककला, लोकगीते, नृत्य यांचा अविष्कार ‘मंगलगाणी-दंगलगाणी’ या कार्यक्रमातून सादर झाला. ‘पसायदान ते कसायदान’ अशी मांडणी करीत, महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, समृद्ध वारसा अशा सांस्कृतिक वैभवाचे दर्शन या कार्यक्रमातून घडविले. त्याला सखींनी उत्स्फूर्त दाद दिली.लोकमत सखी मंचाच्या नोंदणीच्या निमित्ताने अशोक हांडे यांच्या ‘मंगलगाणी-दंगलगाणी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खिंवसरा असोसिएट्स हे टायटल स्पॉन्सरर, तर डब्य्ल्यू. एस. बेकर्स आणि संस्कार ग्रुप आॅफ फाउंडेशन असोसिएट स्पॉन्सरर आहे. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांच्या हस्ते अशोक हांडे यांचा सत्कार करण्यात आला. तुंडुब भरलेल्या नाट्यगृहात ‘ओम नमोजी आद्या...’ने सूरमयी कार्यक्रमाची सुरुवात झाली. ध्वनिचित्रफीत, नृत्य, गीतांमधून, सुमधुर निवेदनातून संस्कृतीचे दर्शन घडविले. पहाटेच्या भूपाळीपासून उत्तररात्री रंगणाऱ्या लावणीचा अनुभव या कार्यक्रमाने दिला. विशेष म्हणजे, अशोक हांडेंच्या मर्मविनोदी निवेदनाने धमाल उडवून दिली. खळखळून हसविले. सखींची मने जिंकली. या कार्यक्रमातून अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविले.‘मोगरा फुलला...’, ‘खेळ मांडियेला वाळवंटी काठी...’, ‘संतभार पंढरीत...’, ‘सूर्य उगवला प्रकाश पडला, आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार...’, ‘घनश्याम सुंदरा...’ या गाण्यांनी पहाट झाली. ‘भलगाडी दादा...’ म्हणत ग्रामीण संस्कृतीतील सुगीची कामे सुरू झाली. बळीराजा शेतात राबू लागला. ‘सुरू झालीया पेरणं...’, ‘काठीन् घोंगडं घेऊ द्या, की रं मलाबी जत्रंला येऊ द्या की...’, असे गावगाड्यांचे दर्शन घडविले. त्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज यांचा कालखंड दाखविण्यात आला. ‘म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात...’ या गीतातून मराठ्यांच्या शौर्याचे दर्शन घडविले. त्यानंतर मराठी मातीशी एकरूप झालेला मर्दानी पोवाडा, ‘पहिले नमन करितो वंदन...’ ‘गणपती आला आणि नाचवून गेला..’ अशी गीते सादर झाली. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असणारे दशावतार, ‘विंचू चावला, विंचू चावला...’ असे म्हणत एकनाथांचे भारूड, खंडेरायाचा महिमा सांगणारे वाघ्यामुरळी नृत्य सादर झाले. ‘आजी गण नाचला...’ असा तमाशातील गण सादर झाला. गण, गवळण, बतावणी झाली. .....या लावणीवर सखींनी अशरक्ष: शिट्या वाजूवन टाळ्यांचा कडकडाट केला. कृष्ण, मावशी, गवळणी, पेंद्या या तमाशातील फार्स धमाल उडवून दिली. राजकीय भाष्यही केले.‘नवरा आला वेशीपाशी...’ अशी लग्नसराईत सादर होणारी गीते, ‘डोंगराचे अडून, एक बाई चांद उगवला, चांद उगवला’ हे मालवणी संस्कृतीचे दर्शन घडविले. ‘ने मजसी ने, परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ हे स्वांतत्र्यवीर सावरकराचे मातृभूमीप्रेमाचे दर्शन घडविणारे गीत झाले . उत्तरार्धात कलावंतांचा सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)देशात काही ‘मंगल’ घडायचे असेल, ‘दंगल’ घडू द्यायची नसेल, तर ‘मंगलगाणी-दंगलगाणी’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरांत आणि मनामनांत पोहोचायला हवा. भारताचा अभिमान जसा अशोकस्तंभ आहे; तसाच महाराष्ट्राचा अभिमान, सांस्कृतिक ‘अशोक’स्तंभ म्हणजेच चौरंगचे अशोक हांडे आहेत.- विजय बाविस्कर, संपादकसखींनी दिली टाळ्यांची दाद४त्यानंतर ‘एक डोळा हेकना किधर भी देखना...’, हे बायकोवरील गीत, ‘पुरूषांच्या कलियुगाचा आला फेरा, बायको पुढती झुकतो नवरा...’’ असे नवऱ्यावरील गीत हांडे यांनी सादर केले. आजचा पुरूष कसा बैलोबा झालाय, याचे दर्शन घडविले. या गाण्यावर सखींनी सभागृह डोक्यावर घेतले. टाळ्यांची दाद दिली. ‘कलियुगाची झाली भेळ, लावली रताळ आलिया केळं...’ हे गीत सादर करून कलियुगात कसायदान निर्माण झाले आहे, याचे दर्शन घडविले. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा...’ या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.