शहरं
Join us  
Trending Stories
1
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
2
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
3
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
4
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
5
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
6
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
7
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
8
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
9
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...
10
विराटनं केलं भारतीय महिला संघाचं कौतुक,ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर  म्हणाला...
11
आईचं स्वप्न साकार, संघर्षातून लेक बनली IAS; पण मुलीचं यश पाहण्याआधीच आईनं घेतला जगाचा निरोप
12
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
13
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
14
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
15
कार्तिकी एकादशी २०२५: १ नोव्हेंबरला एकादशी तिथी प्रारंभ; पण उपास नेमका कधी? वाचा अचूक माहिती
16
खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार
17
₹25,88,50,70,00,000 स्वाहा, मार्क झुकरबर्ग यांनी संपूर्ण वर्षात जेवढं कमावलं, त्याहून अधिक एका दिवसात गमावलं!
18
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
19
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
20
Shri Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा

कापली गेलेली मान दोन तासात जोडून तरुणाला मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 13:32 IST

विजेवर वेगात सुरू असलेला कटर त्याच्या मानेवरून सऽऽरऽऽ करून गेला अन् रक्ताच्या चिळकांड्या सुरू झाल्या. कापलेली अर्धी मान दोन तासात जोडून एका कर्त्या तरुणाला मृत्युच्या जबड्यातून परत आण्याची किमया मार्कडेय रूग्णालयातील  हृदयरोग आणि रक्तवाहिनी तज्ज्ञ डॉ. विजय अंधारे आणि त्यांच्या पथकाने केली. रमेश वायचळ असे या तरुणाचे नाव.

ठळक मुद्देअवघड शस्त्रक्रिया करुन तरुणाची मृत्युच्या जबड्यातून सुटका

विलास जळकोटकरसोलापूर दि ९ : विजेवर वेगात सुरू असलेला कटर त्याच्या मानेवरून सऽऽरऽऽ करून गेला अन् रक्ताच्या चिळकांड्या सुरू झाल्या. कापलेली अर्धी मान दोन तासात जोडून एका कर्त्या तरुणाला मृत्युच्या जबड्यातून परत आण्याची किमया मार्कडेय रूग्णालयातील  हृदयरोग आणि रक्तवाहिनी तज्ज्ञ डॉ. विजय अंधारे आणि त्यांच्या पथकाने केली. रमेश वायचळ असे या तरुणाचे नाव.बाळे येथे राहणारा रमेश वायचळ शनिवारी फॅब्रिकेटर्स कारखान्यात काम करीत होता. सायंकाळच्या सुमारास अचानक गोल चकत्याच्या आकाराचा कटर विजेच्या प्रवाहाने वेगात सुरू असताना रमेशच्या उजव्या मानेला लागला आणि जवळपास चार इंच मानेचा भाग चिरत गेला. जिवाच्या आकांताने त्याचा आरडाओरडा पाहून कारखान्यातील व्यवस्थापकासह सर्वांनी तातडीने त्याला डॉ. होगाडे यांच्याकडे नेले. त्याची चिंताजनक स्थिती पाहून माकंर्डेय सहकारी रुग्णालयात डॉ. विजय अंधारे यांच्याकडे जाण्यास सुचवले. रुग्णाच्या मानेला कापड दाबून रुग्णवाहिका माकंर्डेय रुग्णालयात दाखल. आपत्कालीन विभागात डॉ. आशुतोषकुमार सोहनी हजर होते. त्यांनी तत्परतेने शस्त्रक्रियागृहात दाखल करण्याची प्रक्रिया राबवली. डॉ. आशुतोष यांनी रुग्णालयाच्या व्हॉट्सअ?ॅप ग्रुपवर व्हिडीओ पाठवला आणि १५ मिनिटात मुख्य इन्चार्ज ममता मुनगा-पाटील आणि घरी गेलेले कर्मचारी मिळेल त्या वाहनाने हजर झाले. सर्वांनी मिळून प्रयत्न सुरू केले. एव्हाना रात्रीचे ९.३० वाजले. रक्तस्राव मोठा होत असल्याने डॉ. आशुतोष त्याच्या मानेवर जोराचा दाब धरून होते. डॉ. विजय अंधारे यांनी सर्वप्रथम पाहणी केली. दहा सें. मी. लांब, ६ सें. मी. रुंद आणि ४ सें. मी. खोल जखम होती. रक्तप्रवाहामुळे आत कुठली रक्तवाहिनी तुटली याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे मान सरळ करता येणेही अशक्य होते. त्यातच रक्तदाब ७८/८० दिसत होता. हृदयाचे ठोके खाली ४० पर्यंत यायचे मध्येच १३०/१४० यायचे. यामुळे चिंताजनक स्थिती होती. रक्तदान आणि नाडी बंद होऊ नये यासाठी तीन-चार सलाईन लावून दिले. जखम काय आहे हे पाहण्यासाठी रक्त शोषून घेण्यासाठी सक्शन मशीन टाकली. त्यामुळे मान हलवावी की, नाही हे लक्षात येणार होते, अन्यथा रक्तवाहिनी तुटेल याची भीती होती. अखेर निदान झाले. मेंदूकडून हृदयाकडे घेऊन जाणारी रक्तवाहिनी जवळपास ७ सें.मी. उभी कट झाली होती. १ ते २ मि. मी. पापुद्रा काय तो चिकटून होता. दुसºया शुद्ध रक्तपुरवठा करणाºया हृदयाकडून मेंदूकडे जाणाºया रक्तवाहिन्यांच्या फांद्या तुटून गेल्या होत्या. त्यातून फार रक्तस्राव सुरू होता. काय झाले याची कल्पना आली आणि डॉ. अंधारेंनी ह्यडोंट वरीह्ण म्हणत झटपट शस्त्रक्रिया सुरू केली. रक्तवाहिनी कंट्रोल करण्यासाठी क्लॅप सरकवून रक्तस्राव थांबवला. मेंदूकडून हृदयाकडे जाणारी जी रक्तवाहिनी फाटली होती तिला सूक्ष्म टाके टाकून दुरुस्त केली. रात्री ९.३० वाजता सुरू झालेली क्लिष्ट अशी शस्त्रक्रिया ११.३० वाजता पूर्ण झाली अन् सर्वांच्या चेहºयावर हासू विलसले. उमद्या घरच्या कर्त्यासवरत्या तरुणाला वाचवल्याचे समाधान आम्हा सर्वांच्या चेहºयावर दिसल्याचे वर्णन डॉ. विजय अंधारे यांनी चलचित्राप्रमाणे लोकमतशी बोलताना सांगितले. डॉ. अंधारे यांनी यापूवीर्ही चेंदामेंदा झालेल्या रुग्णांच्या रक्तवाहिन्या जोडून रुग्णाला जीवदान दिले आहे.-----------------यांचे लाभले योगदान- दोन-अडीच तास मृत्यूशी झुंज देणाºया रमेशचे प्राण वाचवण्यासाठी माकंर्डेय सहकारी रुग्णालयातील डॉ. विजय अंधारे यांच्यासह भूलतज्ज्ञ डॉ. मंजुनाथ डफळे, समन्वयक भाग्यश्री मणुरे, डॉ. आशुतोषकुमार सोहनी, मुख्य इन्चार्ज ममता मुनगा-पाटील, केशव मेरगू, बाळकृष्ण कोटा, सुभाष बोद्धूल यांच्यासह अनेकांनी वेळीच योगदान दिल्याने अत्यंत क्लिष्ट अशी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.-----------------------काळ आला होता पण वेळ नव्हती!- एखाद्या रुग्णावर जीवघेणी आपत्ती ओढावणे आणि त्याला वेळीच रुग्णालयात दाखल करणे, तितक्याच तत्परतेने आणीबाणीच्या स्थितीतही सर्व स्टाफ वेळेवर पोहोचणे या साºया प्रक्रिया जुळून आल्या. माकंर्डेय सहकारी रुग्णालयातील प्रशासनानेही प्रसंगावधान राखत दाखवलेले भान यामुळे मरणाच्या दाढेतून रमेशला जीवदान मिळाले. आम्हाला यश आले. शेवटी ह्यकाळ आला होता पण वेळ नव्हतीह्ण अशी स्थिती यावेळी अनुभवयास मिळाल्याच्या भावना माकंर्डेय सहकारी रुग्णालयाचे हृदयरोग आणि रक्तवाहिनी तज्ज्ञ डॉ. विजय अंधारे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.