शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याला ठार मारणाऱ्याला अटक

By admin | Updated: January 28, 2017 03:19 IST

मोकाट फिरणाऱ्या कुत्र्याला केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी सोमवारी एकाला अटक केली आहे.

मुंबई : मोकाट फिरणाऱ्या कुत्र्याला केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी सोमवारी एकाला अटक केली आहे.किशन भागवत (३९) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. जो गोरेगाव पश्चिमच्या जवाहरनगर परिसरात एका कन्स्ट्रक्शन साइटवर बिगारी काम करतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवतने गेल्या आठवड्यात एका कुत्र्याला काठीने बदडून काढले. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला. ही बाब स्थानिक प्राणीप्रेमींना समजली आणि त्यांनी या प्रकरणी गोरेगाव पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करत सुरुवातीला अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्राणीप्रेमींनी घटनास्थळाच्या आसपास असलेल्या सोसायटीतील लोकांच्या मदतीने या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले. जे पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी त्याच्या मदतीने भागवतची माहिती मिळवली आणि सोमवारी त्याचा गाशा गुंडाळला. त्याला आणि त्याच्या मित्राला तो कुत्रा चावला होता. त्याच्या रागात त्याने ही मारहाण केल्याचे कबूल केले. मात्र त्याच्या अंगावर कुठेच कुत्रा चावल्याच्या जखमा नाहीत, तसेच कुत्रा आपल्यावर भुंकला किंवा आपल्याला चावला तर त्याला ठार मारणे हा उपाय नाही, असे प्राणीप्रेमींचे म्हणणे आहे. या प्रकरणी त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून अधिक चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)