शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

"हॅलो, मी शरद पवार बोलतोय... बदलीचं तेवढं बघा"; मंत्रालयात आलेल्या 'त्या' फोन कॉलनं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 06:55 IST

पुण्यातून तिघांच्या आवळल्या मुसक्या

मुंबई : ‘हॅलो, मी शरद पवार बोलतोय... बदलीचं तेवढं बघा...’असा फोन मंत्रालयातील महसूल विभागात आला. एकच खळबळ उडाली. चौकशीत पुण्यातील दोघांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढत हा फोन केल्याचे समोर आले. पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर आणखी एकाला अटक करण्यात आली.नुकत्याच काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्याच संदर्भात महसूल विभागातील सचिव स्तरावरील अधिकाऱ्याला बुधवारी हा फोन आला. फोन क्रमांक पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकमधून आल्याचे दिसत होते. त्यात, आरोपींनी शरद पवार यांच्या नावाचा वापर करून त्यांचा आवाज काढत बोलणे केले. खुद्द शरद पवार यांचा फोन आल्याने हा अधिकारी हडबडला. यावेळी एका अधिकाऱ्याच्या बदलीबाबत लक्ष देण्यास सांगण्यात आले. फोन ठेवल्यानंतर पवार यांचा दिल्ली दौरा सुरू असल्याचे अधिकाऱ्याच्या लक्षात आले. त्यामुळे ‘सिल्वर ओक’मधून फोन कसा केला? या संशयातून त्यांनी तत्काळ तिकडे फोन करून चौकशी केली. तेव्हा असा कुठलाही फोन केला नसल्याचे समजले. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. खंडणी विरोधी पथकाच्या तपासात पुणे कनेक्शन समोर आले. याप्रकरणी विकास गुरव (५१), किरण काकडे (२६) आणि धीरज  पठारे या तिघांना अटक करण्यात आली. तिघेही बेरोजगार असल्याचे समजते. त्यांनी असे का केले? याबाबत तपास सुरू आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार