शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अमली पदार्थ तस्करी प्रकरणी ठाणे पोलिसांची ममता कुलकर्णीवर नजर

By admin | Updated: April 28, 2016 17:34 IST

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ (ड्ग्स) तस्करीमध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णीचा सहभाग असल्याचा ठाणे पोलिसांना संशय आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 28 - सोलापूरमध्ये छापा टाकून 20 टन इफेड्रीन ड्ग्ज जप्त करणारे ठाणे पोलीस सध्या अभिनेत्री ममता कुलकर्णीचा शोध घेत आहेत. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ (ड्ग्स) तस्करीमध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णीचा सहभाग असल्याचा ठाणे पोलिसांना संशय आहे. ममता कुलकर्णीचा पती विकी गोस्वामी अमली पदार्थ तस्करीचा मुख्य सुत्रधार असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलीसांनी ममता कुलकर्णीच्या भुमिकेची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.
 
विकी गोस्वामीवर अमली पदार्थ तस्करीप्रकरणी अनेक गुन्हे आहेत. 1997मध्ये अमली पदार्थ तस्करीप्रकरणी दुबईत त्याला अटक करण्यात आली होती. तसंच 15 वर्षांच्या कारावासाची शिक्षादेखील झाली होती. त्यानंतर विकी गोस्वामी ममता कुलकर्णीसोबत केनियाची राजधानी नैरोबी येथे राहायला गेला. केनियामध्येही त्याच्यावर नवे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ड्ग्स तस्करी प्रकरणांमध्ये ठाणे पोलिसांसह अमेरिकेलाही तो हवा आहे. 'हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असून विकी गोस्वामी महत्वाचा धागा आहे. ममता कुलकर्णीची काय भुमिका आहे याचा तपास करत आहोत', अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी इफेड्रीन ड्ग्स प्रकरणी बोलताना दिली आहे.
 
ममता कुलकर्णी सध्या केनियामध्ये असल्याचा संशय आहे. 90 च्या दशकात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये ममता कुलकर्णीचं नाव घेतलं जायचं. आमीर खान, सलमान खान आणि शाहरुख खान या तिघांसोबतही ममता कुलकर्णीने काम केलं होतं. ठाणे पोलिसांनी ममता कुलकर्णीबद्द्ल जास्त माहिती देण्यास नकार दिला असला तरी सुत्रांच्या माहितीनुसार या अमली पदार्थ प्रकरणाचा ममता कुलकर्णी मुख्य चेहरा असल्याची माहिती मिळत आहे.
विकी गोस्वामी सध्या केनियात असून त्याच्याविरोधात इंटरपोल नोटीस काढलेली असल्याने तो केनिया सोडून जाऊ शकत नाही. यामुळेच त्याने ममता कुलकर्णीला दुबई, सिंगापूर, दक्षिण अफ्रिका आणि अमेरिकेतील आपल्या ग्राहकांना भेटण्यास सांगितले होते अशी माहिती ठाण्याच्या एका पोलीस अधिक-याने दिली आहे.
 
ममता कुलकर्णीने महाराष्ट्रातदेखील अमली पदार्थ तस्करी केली आहे. विकी गोस्वामी बँकांचे व्यवहार करण्यासाठी ममता कुलकर्णीच्या नावाचा वापर करत होता. अमली पदार्थ तस्करीच्या माध्यमातून मिळालेला पैसा या दोघांनी हवालाच्या सहाय्याने आपल्या बँक खात्यात जमा केला होता.  पण ममता आजपर्यंत पोलिसांच्या रडारवर आली नव्हती. 
 
काही दिवसापुर्वी ठाणे पोलिसांनी सोलापूरमध्ये कारवाई करत  20 टन इफेड्रीन जप्त केले होते. ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारत, पोलंड आणि युरोपातील काहीजण हा माल गुजरातमार्गे मुंबईतून पूर्व युरोपला पाठवण्याची योजना आखली होती. 
दरम्यान देश-विदेशात इफेड्रीन या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या सोलापूरच्या एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. या कंपनीचा मालक तसेच दोन हजार कोटींच्या या व्यवहारातील प्रमुख आरोपी मनोज जैन (४६) , सल्लागार पुनित श्रींगी (४६) आणि मालाचा देशभरात पुरवठा करणारा हरदीपसिंग इंदरसिंग गिल (४२) या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने या तिघांचीही रवानगी १४ दिवसांकरिता पोलीस कोठडीत केली आहे.