शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
5
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
6
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
7
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
8
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
9
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
10
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
11
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
12
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
13
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
14
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
15
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
16
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
17
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
18
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
20
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?

मालवण किनारपट्टी ‘हाऊसफुल्ल’

By admin | Updated: November 11, 2015 00:16 IST

सुविधांकडे दुर्लक्ष : तारकर्ली एमटीडीसी, हॉटेल्सचे ३० नोव्हेंबरपर्यंत बुकिंग

सिद्धेश आचरेकर -- मालवण  पर्यटन हंगामाची सलामी धीम्यागतीने झाली असली तरी दिवाळी सुट्टी कालावधीत अपेक्षित पर्यटन वाढणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पर्यटन स्थळांच्या ठिकाणी म्हणावी तशी पर्यटकांची वर्दळ नसली तरी नोव्हेंबर महिन्यात आगाऊ बुकिंग झाले असल्याने १० ते ३० नोव्हेंबरपर्यंत तारकर्ली एमटीडीसी तसेच मालवण शहर तसेच तारकर्ली देवबाग याठिकाणचे खासगी लॉज व हॉटेल्स ‘हाऊसफुल्ल’ असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे बुकिंग न करता येणाऱ्या पर्यटकांची काही प्रमाणात तारांबळ उडण्याची शक्यता आहे. जागतिक पर्यटनाचा ‘हॉटस्पॉट’ असलेले किल्ले सिंधुदुर्ग पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. त्याचप्रमाणे येथील स्वच्छ सुंदर किनारेही लक्ष वेधून घेत आहेत. पर्यटकांच्या आदरातिथ्यासाठी पर्यटन व्यावसायिक सज्ज झाले आहे. दिवाळी पर्यटन हंगामाला राज्यभरासह देशी-विदेशी पर्यटकांनी मालवण, तारकर्ली, देवबागला सर्वाधिक पसंती दिली आहे. दिवाळी सुट्टी आणि सलग जोडून आलेल्या सार्वजनिक सुट्ट्या असल्याने गेल्या आठवड्याभरात आगाऊ बुकिंग ‘फुल्ल’ झाले आहे. पर्यटकांच्या आगाऊ बुकिंगनंतर हंगामाची आश्वासक सुरुवात होणार असल्याचे पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले. किनारपट्टी आगामी महिनाभर गर्दीने तुडुंब राहणार आहे.सुविधांचा बोजवारा : चेंजिंग रूमची मागणीमालवणात पर्यटन हंगामात सुविधांची वानवा सर्वत्र दिसून येते. पर्यटन हंगाम वाढला की मोठी डोकेदुखी असते ती वाहतूक कोंडीची. वाढते पर्यटन व अरुंद रस्ते यामुळे वाहतूक कोंडी झाली तर वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. मालवण बंदर जेटीवरून किल्ले सिंधुदुर्ग दर्शन करता येते. मात्र, बंदर जेटी येथे पर्यटकांना सावली मिळण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात आलेली नाही. दुपारचे तापमान वाढल्याने उन्हाचा प्रतिकार करणे असह्य आहे. उन्हाचे चटके खात किल्ले सिंधुदुर्गची भ्रमंती करावी लागत आहे. पर्यटकांच्या सुविधेसाठी जेटीवर सावली येण्यासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे. किनारपट्टीवर शौचालये, प्रसाधनगृह यांची संख्या अपुरी आहे. महिलांसाठी चेंजिंग रूम आदींची सुविधा देण्यात यावी, अशी मागणी पर्यटनप्रेमींतून होत आहे. मच्छी थाळी दरपापलेट : ३०० ते ३५० (फ्राय : २४०)सुरमई : ३०० ते ३५० (फ्राय : २३०)कोळंबी : ३०० ते ३५० (फ्राय : १५०)सरंगा : २०० ते २५० (फ्राय : १३०)बांगडा : १५० (फ्राय : ६०)मोरी : १५०कालवा : १५०सागरी पर्यटन आकर्षणगतवर्षी दिवाळी हंगामात २५ हजाराहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली होती. यावषीर्ही आगाऊ बुकिंगचा विचार करता पर्यटकांची संख्या वाढणार आहे. मालवणात तालुक्यात असलेल्या कृषी पर्यटनाकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. घुमडे, हडी, काळसे, धामापूर आदी गावातही पर्यटक हजेरी लावत आहेत.