शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

राज्यात २१ हजार बालके तीव्र कुपोषित, मेळघाटात ३० दिवसांत ३७ बालकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 18:11 IST

आदिवासी भागातील बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी शनिवारी गाभा समितीची बैठक मुंबई येथे आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात आली. राज्यात एकवीस हजार बालके तीव्र कुपोषित असल्याची शासकीय आकडेवारी आहे.

- नरेंद्र जावरे अमरावती - आदिवासी भागातील बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी शनिवारी गाभा समितीची बैठक मुंबई येथे आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात आली. राज्यात एकवीस हजार बालके तीव्र कुपोषित असल्याची शासकीय आकडेवारी आहे. मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात जुलै महिन्यात उपजतसह  शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ३७ बालकांनी अखेरचा श्वास घेतल्याचे संतापजनक चित्र आहे. कुपोषणाच्या तीव्र श्रेणीतील १९५ बालकांना पावसाळ्यात विविध जलजन्य आजारांपासून वाचवण्याची गरज आहे.  मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यांत एप्रिल ते जून या तीन महिन्यात ११४ बालकांचा मृत्यू झाला. गतवर्षीपेक्षा ही आकडेवारी  जास्त असल्याची नोंद आहे. बालमृत्यूच्या संख्येत वाढ झाल्यावर नेहमीप्रमाणे प्रशासनाचे वरातीमागून घोडे धावले. जुलै महिन्यात चिखलदरा तालुक्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील चार, तर उपजत तीन असे एकूण सात, तर धारणी तालुक्यात शून्य ते सहा वयोगटातील २१ आणि नऊ उपजत अशा एकूण ३० असे महिन्याभरात दोन्ही तालुक्यात ३७ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. राज्यातीच्या आदिवासी भागातील बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाच्या विविध उपाययोजना अस्तित्वात असताना, मेळघाटात डॉक्टरांच्या रिक्त जागा कायम आहेत. नागपूर अधिवेशनापूर्वी आरोग्य विभागाच्या संचालकांनी मेळघाटात येऊनही याबाबत काहीएक फायदा झाला नाही, हे विशेष.

राज्यात ११ हजार ३७८ व्हीसीडीसी केंद्र सुरू    राज्यात सॅममध्ये २० हजार ९०३ बालक आढळली असून, मॅममध्ये ३३ हजार ८२७  बालकांची नोंद झाली आहे. व्हीसीडीसी योजनेंतर्गत सॅम बालकांना अमायलेज युक्त आहार देण्यात येत आहे. आरोग्य विभागामार्फत औषध पुरवठा करण्यात आला असून, आदिवासी भागात ठिकठिकाणी कुपोषित बालकांवर यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यांमध्ये एकूण २८१ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. स्तनदा माता, गरोदर माता, नवजात बालके यांची तपासणी गावांमध्ये केली जात असून, साथरोग उद्भवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यातील २५ तालुके जोखीमग्रस्त असल्याने पावसाळ्यामध्ये संपर्क तुटण्यापूर्वी आरोग्य सुविधा मिळावी, यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

गाभा बैठकीत मेळघाटच्या समस्याबाल विकास प्रकल्प अधिकाºयांसह पर्यवेक्षकांना वाहन उपलब्ध करून देण्यात यावे, २९ गावांत पिण्याच्या पाण्याचे स्रोत असलेले बोअरवेल बंद असल्याचा मुद्दा खोज संस्थेचे बंड्या साने यांनी मांडला. आयटी कनेक्टिव्हिटीसंदर्भात ३० गावे राहिल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. अंगणवाडी केंद्रातून सतत खिचडी न देता, कुठला आहार आदिवासी बालकांना देण्यात यावा, याबाबतही तज्ज्ञांनी मत मांडली. नंदुरबार, मेळघाट, पालघर, आदिवासी जिल्ह्यांमध्ये विविध योजनांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. आदिवासी भागातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी उपायोजना सुचविण्याचे सांगण्यात आले.

मेळघाटातील १९५ बालक तीव्र कुपोषितमेळघाटच्या धारणी तालुक्यात कुपोषणाची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. धारणी तालुक्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील २० हजार ९०१ बालके असून, त्यातील सर्वसाधारण श्रेणीत ११ हजार ६१९, मध्यम श्रेणीत ५४८४,  कमी वजनाची १६१३ बालके आहेत. कुपोषणाच्या श्रेणीनुसार सॅममध्ये १३१, तर मॅममध्ये ११२२ बालके आहेत. चिखलदरा तालुक्यात १४ हजार १३२ बालके शून्य ते सहा वर्षे वयोगटात असून, ८४७२ सर्वसाधारण श्रेणीत आहेत. ३७०७ कमी वजनाची असून, तीव्र कमी वजनाची ९४८ बालके वजन-उंचीनुसार आहेत. सॅममध्ये ६४ तर मॅममध्ये ५०४ बालकांचा समावेश आहे. एकंदर दोन्ही तालुक्यात सॅम अंतर्गत असलेल्या १९५ बालके पावसाळ्यात मृत्यूच्या कराल दाढेत उभी आहेत. त्यांना वाचविण्याची गरज आहे.

कुपोषित बालकांसाठी मेळघाटात व्हीसीडीसी केंद्र उघडण्यात आले आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध योजना सुरू आहेत. जुलै महिन्यात मेळघाटात शून्य ते सहा व उपजत अशा ३७ बालकांच्या मृत्यूची नोंद आहे.- प्रशांत थोरात, उपमुख्य कार्यपालन अधिकारी (महिला व बाल कल्याण), जिल्हा परिषद, अमरावती

बालमृत्यू रोखण्यासाठी राज्याच्या गाभा समितीची बैठक मुंबई येथे पार पडली. राज्यातील आदिवासी भागातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने आवश्यक उपाययोजना व काही विषयांवर तज्ज्ञांचे मत घेण्यात आले. बंड्या साने, खोज संस्था (मेळघाट)तथा सदस्य, गाभा समिती

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्यnewsबातम्या