शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मल्ल्या यांच्याविरुद्धची सुनावणी २८पर्यंत तहकूब

By admin | Updated: March 13, 2016 04:42 IST

प्रवाशांकडून वसूल केलेला ३२ कोटी रुपयांचा सेवाकर सरकारी तिजोरीत जमा करण्याचा आदेश किंगफिशर एअरलाइन्सचे संस्थापक विजय मल्ल्या व अन्य संचालकांना द्यावा

मुंबई : प्रवाशांकडून वसूल केलेला ३२ कोटी रुपयांचा सेवाकर सरकारी तिजोरीत जमा करण्याचा आदेश किंगफिशर एअरलाइन्सचे संस्थापक विजय मल्ल्या व अन्य संचालकांना द्यावा, तसेच कनिष्ठ न्यायालयाने मंजूर केलेला मल्ल्या यांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी सेवाकर विभागाने उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी २८ मार्चपर्यंत तहकूब करत, उच्च न्यायालयाने या दोन्ही याचिकांची प्रत मल्ल्या, अन्य संचालक आणि किंगफिशर एअरलाइन्सला पाठवण्याचे निर्देशही न्यायालयाने सेवाकर विभागाला दिले.गेल्या वर्षी दंडाधिकाऱ्यांनी विजय मल्ल्या यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. दंडाधिकाऱ्यांच्या या निर्णयाला सेवाकर विभागाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, तसेच २०१०-११ या आर्थिक वर्षात मल्ल्या यांनी किंगफिशर एअरलाइन्सच्या प्रवाशांकडून ३२.७ कोटी रुपये सेवाकर वसूल केला. मात्र, ही रक्कम सरकारकडे जमा केली नाही. त्यामुळे मल्ल्या, तसेच किंगफिशरच्या अन्य संचालकांना ही रक्कम जमा करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी याचिकाही सेवाकर विभागाने न्यायालयात दाखल केली आहे. या दोन्ही याचिकांवरील सुनावणी शुक्रवारी न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठापुढे होती. या दोन्ही याचिका जलद गतीने निकाली काढाव्यात, अशी विनंती सरकारने केली आहे. त्यावर न्या. भडंग यांनी सरकारने जुलैपासूनच या प्रकरणाचा पाठपुरावा का केला नाही? अशी विचारणा केली. त्यावर या प्रकरणाचा सेवाकर विभाग सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे न्या. भडंग यांना अ‍ॅड. अद्वैत सेठना यांनी सांगितले. याचिकेची प्रत मल्ल्या व अन्य प्रतिवाद्यांना पाठवण्यात आल्या आहेत. मात्र, ते उपस्थित राहात नसल्याचेही अ‍ॅड. सेठना यांनी निदर्शनास आणून दिले.