शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
3
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
4
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
5
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
6
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
7
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
8
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
9
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
10
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
11
सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 
12
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
13
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
14
आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका!
15
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
16
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
17
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
18
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा यादी
19
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
20
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...

पावसाळ्यापूर्वी माळीणकरांना मिळणार घर

By admin | Updated: May 11, 2016 00:58 IST

माळीण दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम सुरू झाले आहे. घरबांधकामे सुरू करण्यात आली असून पावसाळ््यापूर्वी ६७ पैकी निम्मी घरे पूर्ण करण्यात येणार आहेत.

घोडेगाव : माळीण दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम सुरू झाले आहे. घरबांधकामे सुरू करण्यात आली असून पावसाळ््यापूर्वी ६७ पैकी निम्मी घरे पूर्ण करण्यात येणार आहेत. दिवाळीपर्र्यंत घरे, मूलभूत सोई-सुविधा अशी सर्व कामे पूर्ण करून घरे ताब्यात देण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.माळीण ग्रामस्थांसाठी सुरू असलेल्या कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या कामाची पाहणी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केली. या वेळी प्रांताधिकारी कल्याणराव पांढरे, कार्यकारी अभियंता एस. बी. देवढे, जे. आर. विभूते, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एम. कुलकर्णी, वास्तुविशारद योगेश राठी, प्रकल्पाधिकारी चेतना मोरे, तहसीलदार बी. जे. गोरे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, पंचायत समितीचे उपसभापती सुभाष तळपे, सदस्य संजय गवारी, सरपंच दिगंबर भालचिम आदी उपस्थित होते. राव म्हणाले, ‘‘सध्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्राथमिक सोई-सुविधा पुरविणे, प्लॉट तयार करणे, बसस्थानक बांधणे, गटार बांधणे, संरक्षक भिंत बांधणे, रस्ते तयार करणे, जलनिस्सारण, स्मृतिवन ही कामे सुरू आहेत. जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, समाजमंदिर, पशुवैद्यकीय दवाखान्यात, पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण व भूमिगत गटारे ही ८ कामे सुरू आहेत. यापैकी काही कामे जवळपास संपत आली आहेत. मोठी कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण केली जातील. कामांच्या गुणवत्तेवर लक्ष देण्यात येत आहे. यासाठी ‘थर्ड पार्टीद्वारे कामाचे आॅडिट केले जात आहे. काम सुरू असताना कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमार्फत कामाची दक्षता व गुणनियंत्रण ठेवली जात आहे. पावसाळ््यापर्यंत जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अजून एक महिन्यानंतर पावसाळा सुरू होत आहे. त्यामुळे पावसाळ््यापूर्वी निम्म्या घरांची कामे पूर्ण करणार व पावसाळा संपल्याबरोबर उर्वरित काम पूर्ण केले जाईल. घरे पूर्ण झाल्यानंतरच घरे ताब्यात दिली जाणार आहेत. कारण घरांबरोबरच बाकीची कामेदेखील पूर्ण होणे आवश्यक आहे. (वार्ताहर)पावसाळ््यानंतर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. रस्त्याच्या कडेला, मोकळ््या जागेत, स्मृतिवनाच्याभोवती वृक्षलागवड केली जाणार आहे. तसेच नवीन वसाहतीच्या मागे असलेल्या डोंगरावर मातीला थांबून ठेवण्यासाठी बांबूची व घायपात लागवड केली जाणार आहे. माळीणला पाण्यासाठी विहीर घेण्यात आली. दोन ठिकाणी बोअर घेण्यात आले, मात्र तीनही ठिकाणी पाणी लागले नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात जुन्या स्रोतातून पाण्याचा उपसा केला जाणार आहे, त्याचबरोबर स्थानिक स्तरावर विभागामार्फत सुरू असलेल्या पायलडोह बंधाऱ्याचे काम अपूर्ण आहे. हे काम दीड ते दोन महिन्यांत पूर्ण करून यातून वर्षभर पाणी मिळविणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे.या वेळी ग्रामस्थांनी पाणी नसल्याबाबत तक्रार करीत धरणातून पाइपलाइन टाकून पाणी द्यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. भविष्यात धरणातून पाइपलाइन टाकण्याची परवानगी जलसंपदा विभागाकडे मागितली जाईल. पायलडोह काम दोन महिन्यांत पूर्ण करून याचा स्रोत माळीणसाठी पाणीपुरवठ्याला वापरला जाईल, असे या वेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.