ऑनलाइन लोकमतखोडद, दि. 3 - मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री १० वाजता नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात पुन्हा दरड कोसळली. त्यामुळे घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. गेल्या महिन्याभरात या घाटात आतापर्यंत दरड कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. घाटातील छत्री पॉर्इंट पासून पुढील वळणावर ही दरड कोसळली आहे. पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. रात्र असल्याने दुरूस्तीच्या कामात अडथळे येण्याची शक्यता असून उद्यापासून वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहिल.दोन दिवसांपूर्वी ठाण्याच्या जिल्ह्याधिका-यांनी घाटाची पाहणी करून अनके ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवली होती.
माळशेज घाटात पुन्हा दरड कोसळली
By admin | Updated: August 3, 2016 00:46 IST