शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

भिकारी मुलांसाठी धोरण करा

By admin | Updated: March 16, 2016 08:37 IST

शहरात भीक मागणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी सर्वसमावेशक धोरण आखा, अशी सूचना उच्च न्यायालयाने सरकारला केली. भीक मागण्यामध्ये मुलांची संख्या वाढत

मुंबई : शहरात भीक मागणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी सर्वसमावेशक धोरण आखा, अशी सूचना उच्च न्यायालयाने सरकारला केली. भीक मागण्यामध्ये मुलांची संख्या वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत न्या. अभय ओक व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने मुलांना यामधून बाहेर काढत त्यांच्या शिक्षणाची व राहण्याची सोय करण्याची सूचना केली.याआधीच्या सुनावणीवेळी खंडपीठाने रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांची संख्या किती आहे? त्यातील किती मुले अनाथ आहेत? तसेच किती मुलांचे पालक आहेत, इत्यादीची तपशीलवार माहिती सादर करण्याचे निर्देश सरकारला दिले होते. यासंदर्भात टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशन सायन्सच्या (टिस) आशा मुकुंदाना यांनी २०१३मध्ये भीक मागणाऱ्या मुलांच्या केलेल्या जनगणनेचा आधार घेण्याची सूचनाही खंडपीठाने सरकारला केली होती.किती मुलांना या धंद्यात जबरदस्तीने आणले जाते किंवा ते स्वत:हून यामध्ये सहभागी होतात, याची माहिती सरकारने मिळवावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. मुले देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत त्यांना भीक मागायला भाग पाडले जाऊ नये, याची काळजी सरकारने घ्यावी. विस्थापित मुलांची काळजी घेणे, हे सरकारचे कर्तव्य आहे,’ असे याचिकेत म्हटले आहे. (प्रतिनिधी)