मुंबई : दप्तर हलके होणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले असले, तरी त्याची अंमलबजावणी मर्यादीत वेळेतच करा, अशी सूचना गुरूवारी उच्च न्यायालयाने केली.न्या. व्ही. एम. कानडे व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्याची प्रत मिळालेली नाही. तेव्हा ही सुनावणी तहकूब करावी, अशी विनंती सरकारी वकीलाने केली. ती न्यायालयाने मान्य केली. या निर्णयांची अंमलबजावणी मर्यादीत वेळेत करा, अशी सूचना खंडपीठाने केली. दप्तराचे ओझे कमी करावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका स्वाती पाटील यांनी केली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने दप्तराचे ओझे कसे कमी होणार? याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश शासनाला दिले होते. त्यानुसार बुधवारी शासनाने दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले व त्याची माहिती न्यायालयाला दिली. (प्रतिनिधी)
दप्तर लवकर हलके करा - हायकोर्ट
By admin | Updated: July 24, 2015 02:14 IST