शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल गेम बनवा अन् ५ लाख जिंका, रस्ते सुरक्षा जनजागृती मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 04:59 IST

वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. आता त्यात ‘स्मार्ट’ भर पडल्याचे दिसून आले आहे. रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी मोबाइल गेम बनविण्याचा प्रस्ताव करण्यात येणार आहे.

- महेश चेमटेमुंबई - वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. आता त्यात ‘स्मार्ट’ भर पडल्याचे दिसून आले आहे. रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी मोबाइल गेम बनविण्याचा प्रस्ताव करण्यात येणार आहे. ‘नॅशनल असोसिएशन आॅफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनी (नासकॉम)’ यांच्यामार्फत गेम बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत विजेत्या विकासकाला ५ लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.रस्ता सुरक्षा जनजागृतीविषयक नासकॉम यांच्यामार्फत मोबाइल गेम बनविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी नासकॉमला करारापोटी व्यवस्थापन शुल्क म्हणून २ लाख रुपये देण्यात येणार आहे.स्पर्धेच्या आयोजनानंतर पहिल्या ३ क्रमांकांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.यात पहिल्या क्रमांकाला पाच लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला ३ लाख रुपये आणि तृतीय क्रमांकाला २ लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. वित्तीय आणि प्रशासकीय विभागाने एकूण १२ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.२०१४ साली २७ हजार ८५२ वरून रस्ते अपघातात २०१६ साली ७३ हजार ७८७ पर्यंत वाढ झाली. जानेवारी ते १५ नोव्हेंबर २०१७ या काळात ६३ हजार ०१७ नागरिकांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला. रस्ता सुरक्षेसाठी मोबाइल गेममधून किती नागरिकांमध्ये जनजागृती होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.शुक्रवारी घेतला निर्णयराज्यातील रस्ते अपघात हा सरकारचा चिंतेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे, नुकतेच अपघात रोखण्यासाठी अपघातग्रस्त नागरिकांकडून वाहन नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्यामुळे फारसा फरक पडल्याचे दिसून आले नाही. परिणामी, शुक्रवारी रस्ता सुरक्षितताविषयक मोबाइल गेम बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. वाढत्या स्मार्ट फोनधारकांमुळे मोबाइल गेममुळे सर्वांपर्यंत पोहोचणे शक्य होईल. शिवाय रस्ता सुरक्षा आधारित ‘थीम’ गेममुळे नागरिकांमध्ये जनजागृती होईल, असा विश्वास वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकारी व्यक्त करत आहेत.

टॅग्स :MobileमोबाइलGovernmentसरकार