शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

‘मेक इन इंडिया’चे ब्रँडिंग खाक!

By admin | Updated: February 15, 2016 08:14 IST

मेक इन इंडिया’ योजनेचे ‘ब्रँडिंग’ करण्यासाठी मुंबईत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी गिरगाव चौपाटीवरील कार्यक्रमाचे व्यासपीठ कार्यक्रम सुरू

गिरगाव चौपाटीवर अग्नितांडव : महाराष्ट्र रजनीचे व्यासपीठ भस्ममुंबई : मेक इन इंडिया या महत्त्वाकांक्षी योजनेचे ब्रँडिंग करण्यासाठी मुंबईत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी गिरगाव चौपाटीवरील कार्यक्रमाचे व्यासपीठ कार्यक्रम सुरू असतानाच जळून खाक झाले. या दुर्घटनेत जिवितहानी झाल्याचे वृत्त हाती आलेले नव्हते. या आगीमुळे सप्ताहालाच गालबोट लागले आहे.गिरगाव चौपाटीवर रविवारी रात्री मेक इन इंडिया कार्यक्रमांंर्गत मेगा नाईटचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी या भव्य व्यासपीठ उभारले होते. महाराष्ट्र रजनीच्या व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण सुरू होते. या कार्यक्रमाला राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह बॉलीवूड कलाकार अमिताभ बच्चन, आमीर खान यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र रजनीच्या व्यासपीठावर अभिनेत्री पूजा सावंत यांचा चमू लावणी सादर करत होता. नेमके यावेळी नटराजाची मूर्ती असलेल्या व्यासपीठाच्या मध्यभागी आग लागली. दर्शनी भागावर लागलेल्या या आगीनंतर तत्काळ व्यासपीठावर नृत्य सादर करणाऱ्याना कलावंतांना खाली उतरवण्यात आले. मुंबई पोलिसांनी समयसूचकता दाखवत संपूर्ण व्यासपीठासह परिसर रिकामा केला. अवघ्या काही मिनिटांत व्यासपीठावर लागलेल्या आगीने भयंकर स्वरुप घेतले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सोळा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सहा वॉटर टँकर आणि जेट इंजिनद्वारेही आगीवर नियंत्रण मिळण्याचे प्रयत्न सुरु झाले. मात्र घटनास्थळी शोभेचे दारुकाम आणि अग्नीशमन सिलिंडरर्सचा स्फोट झाला. चौपाटीवरील वाऱ्याने ही आग आणखी पसरली. रात्री या परिसरात रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाल्याने अग्मिशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पोहचण्यास काहीसा विलंब झाला. शिवाय सोफा, खुर्च्या आणि पुतळे उभारण्यात आल्याने आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अडचणी आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई हे आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत घटनास्थळी उपस्थित होते.काय घडले, कसे घडले?नटराजाच्या मूर्तीजवळ सुरुवातीला शॉर्टसर्किटपीओपीचे कामाने सुरुवातीला पेट घेतलाफायर वर्क्सच्या सामानामुळे आगीचा भडका वाढलासीएम, उद्धव ठाकरेंपासून अवघ्या २५ फुटांवर आग लागलीआगीवेळी ८००-९०० कलावंत व्यासपीठाच्या मागे होते६० देशांचे प्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित होतेढोल पथक, गोविंदा पथकातील कलावंताचा समावेश होतामुंबई पोलिसांची सतर्कता महत्त्वाची ठरलीपोलिसांनी कलावंतांना, नागरिकांना बाहेर काढलेपोलिसांनी १५ मिनिटांत गिरगाव चौपाटी रिकामी केलीपोलिसांनी कार्पेट आणि ज्वलनशील पदार्थ आगीपासून दूर नेलेसतर्कतेमुळे चेंगराचेंगरीचा प्रसंग उद्भवला नाहीपहिल्या १५ मिनिटांत ३-४ मोठे ब्लास्ट झालेसाऊंड सिस्टिम आणि लाईट्समुळे आग वाढलीह्यकाही वेळात परिस्थिती नियंत्रणातह्णकार्यक्रमात लावणी सादर झाल्यानंतर हा अपघात झाला. अग्निशमन दल घटनास्थळी वेळेत दाखल झाले. काही वेळातच इथली परिस्थिती नियंत्रणात आली. कोणीही जखमी झालेले नाही.- शायना एन.सी., भाजप नेत्याह्यसामान सोडून निघालोह्णलावणीनंतर गोविंदा पथकांचा डान्स होणार होता. त्यात आमचे प्रेमनगर स्पोटर््स क्लब, चुनाभट्टी येथील ५२ मुले स्टेज मागे होती. आम्ही तत्काळ स्टेजचा परिसर सोडला. पण आमच्या बॅगा, अन्य सामान, मोबाईल हे तेथेच राहिले. सामान तेथेच सोडून आम्ही जीव वाचवला.- अमृत कोठेकर, गोविंदा, प्रेमनगर स्पोटर््स क्लबतरुण संशोधकांना सहकार्य - मुख्यमंत्रीतरु णांकडील नवीन कल्पना, नवे अविष्कार आणि संशोधन हे देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे या तरु णांना संशोधनासाठी व नवे अविष्कार घडवण्यासाठी सिलिकॉन व्हॅली आणि सिंगापूरसारखे संशोधनपूरक वातावरण निर्माण करणे गरजचे असून महाराष्ट्र सरकार त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ह्यमेक इन इंडियाह्ण सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी ह्यमहाराष्ट्र इनोव्हेटस्-नेक्स्ट स्टेपह्ण या विषयावरील चर्चासत्रात फडणवीस बोलत होते.यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, राज्य शासनाच्या इनोव्हेशन कौन्सिलचे सह अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, राष्ट्रीय इनोव्हेशन फाऊंडेशनचे अनिल गुप्ता, आय ए बी ए चे हरकेश मित्तल, डॉ. रघुनंदन राजामणी, राज्य शासनाच्या इनोव्हेशन कौन्सीलचे सदस्य सचिव डॉ. राजेंद्र जगदाळे आदी उपस्थित होते.