शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मांस कधी खायचं, कधी नाही यासाठी कॅलेंडर बनवा - उच्च न्यायालय

By admin | Updated: April 5, 2017 18:16 IST

सणउत्सवाच्या काळात मांसविक्रीवर बंदी घालण्यासाठी योग्य ती योजना तयार करा असं मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला सांगितलं आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - सणउत्सवाच्या काळात मांसविक्रीवर बंदी घालण्यासाठी योग्य ती योजना तयार करा असं मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला सांगितलं आहे.
 
मुंबई मटण विक्रेता असोसिएशनच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अनूप मेहता यांच्या खंडपिठाने सणउत्सवाच्या काळात मांसाहारावर बंदी घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारला योग्य ती योजना आखण्यास सांगितलं आहे. सणउत्सवादरम्यान कोणकोणत्या दिवशी मांस विक्रीवर बंदी असावी यासाठी सरकारने योजना आखावी असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
 
यासाठी सरकारने दिशानिर्देश तयार करावेत आणि कोणत्या दिवशी मांस विक्री बंद करायची आहे त्या तारखांची एक यादी तयार करावी अशी सूचना महाराष्ट्र सरकारला केली आहे. 
काय आहे प्रकरण-
2015 मध्ये जैन धर्मियांच्या पर्युषण काळात चार दिवस कत्तलखाना आणि मांसविक्री बंद ठेवण्याचा आदेश सरकारने दिला होता.  या आदेशानंतर राजकीय वातावरण तापलं होतं आणि बराच गदारोळ झाला होता. त्यावेळी मुंबई मटण विक्रेता असोसिएशनने मांसविक्री बंदीच्या राज्य सरकार आणि पालिकेच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली. ही बंदी सरकारने अचानक घातली असल्याचे तसेच त्याबाबत विक्रेत्यांना व लोकांनाही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचा आरोप केला होता. 2015 मध्ये न्यायालयाने मांसविक्री बंदीच्या त्या निर्णयाला स्थगिती दिली होती.