पुणे : राज्यात सध्या काही जिल्ह्णांमध्ये प्रामुख्याने मराठवाडा विभागात खूपच कमी पाऊस पडला आहे. येथील खरीप हंगामदेखील धोक्यात आल्यामुळे या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याचा शासनाचा विचार असून, पंधरा दिवसांत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे,अशी घोषणा कृषी राज्यमंत्री राम शिंदे यांनी मंगळवारी पुण्यात पत्र परिषदेत केली.दिवंगत मुख्यमंंत्री वसंतराव नाईक जयंतीनिमित्त आयोजित कृषी जागृती सप्ताहाची माहिती त्यांनी यावेळी दिली़ शिंदे म्हणाले की, राज्यात आतापर्यंत सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला आहे. परंतु मराठवाड्यातील पाच-सहा जिल्ह्णांमध्ये पावसाने ओढ दिली आहे. यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असून, येथे कृत्रीम पाऊस पाडावा याचा शासन विचार करत आहे. याबाबत शासनस्तराव बैठका सुरु असून, काही संस्था यासाठी पुढे आल्याची माहिती त्यांनी दिली़ खरीपाच्या एकूण क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्रावर म्हणजे ५० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. काही ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांना बियाणे व खताचा पुरेसा पुरवठा करण्याचे पूर्ण नियोजन कृषी विभागाने केले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)राज्य शासनाने घेतलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे़ मात्र, त्यासाठी आतापर्यंत किती तयारी पूर्ण झाली आहे, याची माहिती पुढे आली नाही़ विमान व रडार याबाबतची प्राथमिक तयारी पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्ष प्रयोग राबविण्यास किमान एक महिना कालावधीत लागू शकतो, असे जागतिक हवामान संघटनेचे सदस्य डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले़ कृत्रीम पावसासाठी औरंगाबाद सेंटरराज्यात कृत्रीम पावसाचा प्रयोग करण्यासाठी मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्हा सेंटर धरुन सुमारे २५० किलोमिटरच्या परिघात हा कृत्रीम पाऊस पाडण्याचा विचार सुरु असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडणार
By admin | Updated: July 1, 2015 01:15 IST