शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमराठींसाठी ‘मायमराठी’ प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 05:17 IST

अमराठी भाषिक लोकांना शास्त्रशुद्ध परंतु सोप्या भाषेत मराठी शिकविण्यासाठी ‘मायमराठी’ या नावाने प्रकल्प चालविण्यात येणार आहे. राज्य मराठी विकास संस्था आणि मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभागाच्या माध्यमातून जगात कुठेही, कोणालाही मराठी भाषा शिकता येईल, असे परिपूर्ण साहित्य या प्रकल्पाद्वारे तयार करण्यात येणार आहे.

मुंबई : अमराठी भाषिक लोकांना शास्त्रशुद्ध परंतु सोप्या भाषेत मराठी शिकविण्यासाठी ‘मायमराठी’ या नावाने प्रकल्प चालविण्यात येणार आहे. राज्य मराठी विकास संस्था आणि मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभागाच्या माध्यमातून जगात कुठेही, कोणालाही मराठी भाषा शिकता येईल, असे परिपूर्ण साहित्य या प्रकल्पाद्वारे तयार करण्यात येणार आहे.गेल्या १०० वर्षांत जर्मन भाषा अध्यापनाच्या क्षेत्रात प्रचंड संशोधन आणि विकास झालेला आहे. जर्मन माहीत नसणाऱ्या लोकांपर्यंत जर्मन भाषा पोहोचविण्यासाठी एकात्मिक संवादात्मक पद्धती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अत्यंत प्रगत अशी पद्धती निर्माण करण्यात आली. याच पद्धतीचा वापर करत मराठी भाषेच्या प्रसारासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभागाने अध्यापन क्षेत्रातील तज्ज्ञ आणि भाषातज्ज्ञांच्या सहकार्याने अमराठी लोकांपर्यंत मराठी पोहोचविण्यासाठी ‘मायमराठी’ या नावाने कार्यक्रम सुरू केला आहे.याअंतर्गत एक ते सहा पातळ्यांवर अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. राज्य मराठी विकास संस्था आणि मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभाग यांच्यामध्ये तीन वर्षांच्या कालावधीसाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित होऊन स्थायिक झालेल्या अमराठी भाषिकांना शास्त्रशुद्ध पद्धतीने मराठी भाषा शिकवण्यासाठी अभ्यासक्रम उपलब्ध नाही. याबाबत आजवर विविध संस्थांनी प्रयोग केलेले आहेत. मात्र त्यात कालानुरूप बदल होणे गरजेचे होते. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभागाचा प्रस्ताव राज्य मराठी विकास संस्थेला प्राप्त झाल्यावर या प्रस्तावाचा सांगोपांग विचार करूनच ‘मायमराठी’ हा प्रकल्प सुरू करण्यात आल्याचे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :marathiमराठीMaharashtraमहाराष्ट्र