शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण: 14 लाख वीज मीटर खराब, 4% भरतात वापरापेक्षा जादा पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 06:45 IST

कारवाईनंतरही नोव्हेंबरमध्ये ६.९ टक्के रीडिंग चुकीचे 

- कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :  राज्यातील १४ लाख ८६ हजार ३११ ग्राहकांचे वीज मीटर ‘फॉल्टी’ (खराब) आहेत. ६.९% रीडिंग सदोष आढळून आले आहेत. तसेच ४ टक्के ग्राहकांना सरासरी बिल पाठवले जात आहे. त्यांना वापरापेक्षा अधिक बिल भरावे लागत आहे. आर्थिक परिस्थिती बिघडल्याचा हवाला महावितरणतर्फे दिला जात असला तरी या प्रकारातून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे दिसून येते.

अचूक मीटर रीडिंगबाबत महावितरणने कठोर भूमिका घेतली. अनेक मीटर रीडिंग एजन्सींना निलंबित करण्यात आले; परंतु त्याचा परिणाम मात्र झाला नाही. नोव्हेंबर महिन्यातसुद्धा ६.९ टक्के रीडिंग चुकीचे आढळून आले. ऑक्टोबरमध्ये ही संख्या ७.२ टक्के होती. जून महिन्यातही इतकीच टक्केवारी होती. राज्यभरात ४ टक्के ग्राहकांना सरासरी बिल दिले जात आहे. 

सरासरी मागील तीन महिन्यांच्या रीडिंगच्या आधारावर निश्चित केली जाते. तो काळ उन्हाळ्याचा होता. त्यामुळे स्वाभाविकपणे हिवाळ्यातही ग्राहकांना अधिक वापराचे बिल भरावे लागत आहे. 

मीटर बदलण्यास सुरुवात : महावितरण महावितरणचे अधिकारी यासंदर्भात काहीही बोलायला तयार नाही. कंपनीतील सूत्रानुसार, कंपनीकडे आता मीटरची टंचाईसुद्धा नाही. त्यामुळे फॉल्टी मीटर बदलण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. कंपनी सरासरी बिल बंद करण्याच्या प्रयत्नात असून, रीडिंगमधील चुकीबाबतही गंभीर आहे. 

तपासाची कूर्मगतीहे मीटर चुकीचे रीडिंग दाखवतात. कंपनीला याची माहिती असूनही केवळ २.२ टक्के म्हणजे ३२,२६९ वीज मीटरचाच आढावा घेण्यात आला. तपासात केवळ २,८५९ मीटर व्यवस्थित आढळून आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज