शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणाचा खून ‘मविआ’ने केला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 05:40 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीत ओबीसी नेते फ्लॉवरपॉटसारखे; भाजपच्या प्रदेश ओबीसी आघाडीच्या बैठकीत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ओबीसींचे आरक्षण हे गेले नसून त्याचा महाविकास आघाडी सरकारने खून केला, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये ओबीसी नेत्यांची परिस्थिती शोभेच्या फ्लॉवरपॉटसारखी असते. एखादाच नेता मोठा केला जातो अन् त्याच्या भरवश्यावर दुकानदारी चालविली जाते, अशी तोफही त्यांनी डागली.  

भाजपच्या प्रदेश ओबीसी आघाडीच्या बैठकीत ते बोलत होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर,  उपाध्यक्ष डॉ. संजय कुटे, आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यावेळी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांत ओबीसी आरक्षण मिळाले नाही तरी ओबीसींना भाजप २७ टक्के तिकिटे देईल, अशी घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली.भाजपच्या डीएनएतच ओबीसी आहे. ओबीसींच्या विश्वासावर आम्ही मोठे झालो. महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये ओबीसी नेते असले तरी त्यांच्या पक्षांच्या मालकांना ओबीसींचे हित नको आहे. कारण, त्या मालकांचे राजकारण ओबीसींच्या भरवश्यावर नाही.  महाविकास आघाडीचे मालक कधीच ओबीसींना आरक्षण मिळू देणार नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

...मग केंद्राच्या हाती द्यायांच्यातील कोणीतरी उठतो आणि सांगतो ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. अरे मग तुम्ही कशाला सरकारमध्ये आहात, द्या केंद्र सरकारच्या हातात द्या. ते सरकार चालवूनही दाखवेल आणि करूनही दाखवेल. तुम्हांला इथे वसुली करण्यासाठी निवडून दिले आहे का? असा खोचक सवालही फडणवीस यांनी यावेळी केला.

आरक्षणाचे खरे मारेकरी तुम्हीच : पटोलेंचा पलटवारओबीसींबाबत भाजपचे प्रेम हे पुतना मावशीचे असल्याची टीका करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे आरक्षण घालविण्यासाठी भाजप व देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याची टीका केली. फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले की, आरक्षण संपविणे हा भाजप व रा. स्व. संघाचा अजेंडा आहे. फडणवीस यांच्या कार्यकाळात तेच झाले.   मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला, तेव्हा मात्र केंद्रातील मोदी सरकारने त्या सरकारला मदत करण्याची भूमिका घेतली. महाराष्ट्रात भाजपविरोधी सरकार असल्याने केंद्राने मदत केली नाही. आमच्यावर खापर फोडून भाजप ओबीसींवरील अन्यायाच्या पापातून मुक्त होवू शकत नाही. मंडल आयोगाने ओबीसींना दिलेल्या २७ टक्के आरक्षणाचा त्यावेळी भाजपनेच विरोध केला होता, असा दावाही पटोले यांनी केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसOBC Reservationओबीसी आरक्षण