शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

छतावरील सौरऊर्जा निर्मितीत, महाराष्ट्राची ‘पाॅवरफुल’ कामगिरी; केंद्राकडून मिळाली २६० कोटी ९१ लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 14:56 IST

२०२३-२४ या आर्थिक वर्षात आधीच्या वर्षापेक्षा अधिक चांगली कामगिरी झाल्यामुळे १३७ कोटी रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळणे अपेक्षित आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले...

मुंबई : राज्यात आतापर्यंत २,३७,६५६ वीज ग्राहकांनी छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले असून त्यांची एकूण क्षमता २,७३८ मेगावॅट आहे. घरांच्या छतावर सौर पॅनेल बसवून वीजनिर्मिती करण्यात उत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्याला गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारकडून २६० कोटी ९१ लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम मिळाली आहे.छतावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते. घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. छतावरील सौरऊर्जा निर्मितीच्या बाबतीत किती घरांवर प्रकल्प बसविले, त्यांची वीजनिर्मिती क्षमता किती झाली याबाबतीत केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्याच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. राज्याला छतावरील सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यातील कामगिरीबद्दल केंद्र सरकारने २०१९-२० या वर्षासाठी ५९ कोटी रुपये, २०२०-२१ वर्षात ३७ कोटी रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली. 

२०२१-२२ या आर्थिक वर्षात ६९ कोटी ४७ लाख रुपये आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ९४ कोटी ९१ लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यातून गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारकडून २६० कोटी ९१ लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळाली आहे, असे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले. 

२०२३-२४ या आर्थिक वर्षात आधीच्या वर्षापेक्षा अधिक चांगली कामगिरी झाल्यामुळे १३७ कोटी रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळणे अपेक्षित आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 

अनुदान किती?-    प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घरावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या घरगुती ग्राहकांना केंद्र सरकारकडून थेट अनुदान मिळते. -    एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट क्षमतेसाठी ७८ हजार रुपये अनुदान मिळते.-    दरम्यान, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या ८१,९३८ ग्राहक आहेत. त्यांनी एकूण ३२३ मेगावॅट क्षमतेचे सौर पॅनेल बसविले आहेत. या ग्राहकांना ६४७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

- या योजनेत वीज ग्राहकांना थेट लाभ होत असल्याने योजनेची प्राधान्याने अंमलबजावणी करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला केली आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार