शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra winter session 2021 : सभागृहात घोरणे निषिद्ध; नो हॅट, नो ओव्हरकोट; आमदारांसाठी आचारसंहिता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 06:25 IST

Maharashtra winter session 2021 : उच्च न्यायालयाबाबत किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींबाबत सभागृहात चर्चा करू नये, असेही या आचारसंहितेत म्हटले आहे. 

मुंबई : विधिमंडळात आमदारांच्या वर्तनाबाबत जारी करण्यात आलेल्या आचारसंहितेनुसार आमदारांना हॅट, ओव्हरकोट घालून सभागृहात येण्यास मनाई आहे. सभागृहात बसल्या-बसल्या घोरणे निषिद्ध असेल. 

सभागृहाच्या कामकाजाशी संबंधित नसलेले वृत्तपत्र सभागृहात वाचण्यास आमदारांना मनाई असेल. आमदारांनी आपसात विनोद करू नये. आपसात बोलू नये. फारच गरज असेल तर हळू आवाजात बोलावे. एकमेकांवर ओरडू नये, असे बजावण्यात आले आहे. कामकाजात अडथळा आणण्याच्या उद्देशाने पीठासीन अधिकाऱ्यांच्या आसनाजवळ जाणे आणि त्यांचा माईक ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू नये.  बाकावर उभे राहण्यास मनाई आहे. एकाच वेळी दोन सदस्यांनी बोलण्यास उभे राहू नये. आपल्या हसण्याचा व बोलण्याचा आवाज सभागृहात जाणार नाही, याची काळजी लॉबीतील आमदारांनी घ्यावी. 

आमदारांनी सभागृहात खाद्यपदार्थ आणू नयेत. आपल्या आसनावर कोणताही झेंडा किंवा चिन्ह मांडू नये. कोणतीही जाहिरात होईल असा पोषाख करू नये. सभागृहात धरणे धरू नयेत आणि सभागृहाच्या वेलमध्ये घोषणाबाजी करू नये. सभागृहाच्या निर्णयावर आक्षेप घेण्याचा अधिकार आमदारांना नसेल. इतर सभागृहांवर आक्षेप घेणे अयोग्य आहे. उच्च न्यायालयाबाबत किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींबाबत सभागृहात चर्चा करू नये, असेही या आचारसंहितेत म्हटले आहे. 

आमदारांसाठी आचारसंहिताजाणकारांच्या मते अशी आचारसंहिता आधीपासूनच आहे, पण सदस्यांच्या गैरवर्तनावर चिंता व्यक्त झाल्यानंतर ती नव्याने जारी करण्यात आली. मात्र, या आचारसंहितेत केवळ सभागृहात आमदारांनी कसे वागावे याचाच उल्लेख आहे. ज्या नीतेश राणे यांच्या कथित गैरवर्तनावरून गदारोळ होऊन आचारसंहितेचा विषय ऐरणीवर आला ते गैरवर्तन सभागृहाबाहेर झालेले होते.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा