शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणार आदर्श सरपंच; ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’, पंचायत राजमधील पहिलीच पुरस्कार योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 06:47 IST

महाराष्ट्र आता आपले आदर्श सरपंच निवडणार आहे. बदलत्या गावगाड्याची नोंद घेणारा व बदलू पाहणाºया गावखेड्यांना प्रेरणा देणारा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ हा ऐतिहासिक पुरस्कार ‘लोकमत’ यावर्षीपासून सुरु करत आहे.

मुंबई : महाराष्ट्र आता आपले आदर्श सरपंच निवडणार आहे. बदलत्या गावगाड्याची नोंद घेणारा व बदलू पाहणाºया गावखेड्यांना प्रेरणा देणारा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ हा ऐतिहासिक पुरस्कार ‘लोकमत’ यावर्षीपासून सुरु करत आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच असे आदर्श सरपंच निवडले जाणार आहेत. जिल्हा व राज्य अशा दोन स्तरावर हे अवॉर्ड दिले जाणार आहेत.राज्यातील असंख्य गावे कात टाकत असून एक नवीन सर्वसुविधायुक्त व संपन्न गाव जन्माला येत आहे. हे बदलते गाव हाच देशाच्या भविष्याचा मजबूत पाया आहे. अनेक सरपंचांनी स्वत:ला मातीत गाडून घेत गावांना उभारी दिली आहे. ग्रामपातळीवरील या संघर्षाची व विकासाची नोंद घेण्यासाठी ‘बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंचअवॉर्ड-२०१७’ दिला जाणार आहे. पतंजली आयुर्वेद हे या उपक्रमाचे प्रायोजक तर महिंद्रा ट्रॅक्टर्स हे सहप्रायोजक आहेत.सरपंचांनी गावात विविध क्षेत्रात केलेल्या प्रयोगांची पाहणी करुन हे आदर्श सरपंच निवडले जातील. पहिल्या वर्षी राज्यातील अठरा जिल्ह्यात ही पुरस्कार योजना राबवली जाणार आहे. सुरुवातीला जिल्हा पातळीवर गौरव होईल. गावातील जलव्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण संवर्धन, ई-प्रशासन, रोजगार निर्मिती,कृषी तंत्रज्ञान, उदयोन्मुख नेतृत्वआदी क्षेत्रात सरपंचांनी केलेले कामपाहून या प्रत्येक विभागात जिल्हास्तरावर एका आदर्श सरपंचाची निवड होईल.याशिवाय सर्वांगीण विकास केलेल्या एका सरपंचास जिल्हा पातळीवर ‘सरपंच आॅफ द इयर अवॉर्ड’ ने गौरविले जाईल. या सर्व पुरस्कारप्राप्त सरपंचांचे पुढे राज्य पुरस्कारांसाठी नामांकन होईल. सर्वांना समान संधी हे या पुरस्कारांचे धोरण राहील. पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका ‘लोकमत’ उपलब्ध करुन देणार असून सरपंच त्या माध्यमांतून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामाचा परिचय घडवून देतील. याव्यतिरिक्त थेट जनताही ‘लोकमत’च्या संकेतस्थळावर त्यांना आवडणाºया सरपंचांचे नामांकन करुशकेल. (अधिक माहिती : www.lokmatsarpanchawards.in) प्रवेशिका दाखल केलेल्या व जनतेने नामांकन केलेल्या सरपंचांच्या कामाची तपासणी करुन ‘लोकमत’ने निवडलेले ज्युरी मंडळ आदर्श सरपंचांची निवड करेल.राज्यपातळीवरील दिमाखदार सोहळ्यात जिल्हास्तरावर विविध विभागांत पुरस्कार मिळविलेल्या सरपंचांतून त्या-त्या क्षेत्रातील राज्यपातळीवरील अवॉर्ड दिले जातील. तसेच राज्यपातळीवरील ‘सरपंच आॅफ द इयर’ची निवड होईल.पुरस्कारासाठीची प्रक्रिया1)‘लोकमत’कडे प्रवेशिका सादर करुन प्रत्येक सरपंच या पुरस्कार योजनेत आपले नामांकन दाखल करु शकतात.2)जनताही त्यांना आवडणाºया सरपंचांचे पुरस्कारासाठी नामांकन करु शकेल.3)‘लोकमत’चे ‘ज्युरी’मंडळ नामांकनांतून आदर्श सरपंच ठरवेल.4) प्रथम जिल्हास्तरावर पुरस्कार समारंभ होईल. त्यानंतर राज्याचा सोहळा.पुरस्काराच्या कॅटेगरी आणि निकषजलव्यवस्थापन : गावाला पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी केलेली व्यवस्था, जलसंधारण, पाणी बचत, पाणीपट्टी वसुली पद्धत, सांडपाणी.वीज व्यवस्थापन : गावातील दिवाबत्तीच्या सोयी, वीज बचत, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, वीज निर्मितीसाठी केलेले नावीन्यपूर्ण प्रयोग.शैक्षणिक सुविधा : गावातील शैक्षणिक सुविधा, शालेय व्यवस्थापन, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीचे प्रयोग.स्वच्छता : प्रथमदर्शनी दिसणारे गावाचे रुप, कचरा संकलन पद्धत, घनकचरा व्यवस्थापन, मलनि:स्सारण, हागणदारीमुक्तीआरोग्य : आरोग्याच्या सुविधा, कुपोषणाचे प्रमाण, आरोग्यदायी गावासाठी केलेले प्रयोग, लसीकरण, साथरोगांबाबतचे व्यवस्थापन.पायाभूत सेवा : रस्ते, वीज, पाणी, कम्युनिकेशन, दळणवळण, वाचनालय, मनोरंजन केंद्र, मार्केट या सुविधांची निर्मिती, वीज व पाणी बिल भरण्याची सोयग्रामरक्षण : तंटामुक्ती, अवैध धंद्यांना बंदी, महिला-युवती-बाल सुरक्षेविषयी केलेले प्रयोग, ग्रामरक्षक दलाची स्थापना पर्यावरण संवर्धन : वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, कुºहाडबंदी, चराईबंदी, जल व वायूप्रदूषण, प्लॅस्टिकबंदी, गौण खनिजाचे रक्षण (उदा. वाळूउपसाबंदी)प्रशासन/ ई-प्रशासन / लोकसहभाग : ई-पंचायत व पंचायतकडून दिल्या जात असणा-या आॅनलाईन सेवा, गावक-यांकडून होत असलेला आॅनलाईन सेवांचा वापर, ग्रामसभा व इतर विकास कामांतील लोकसहभाग, कर संकलन, योजनांची अंमलबजावणी, निधी खर्चाचे प्रमाण, उत्पन्नाचे नवीन स्त्रोतरोजगार निर्मिती : ग्रामपातळीवर रोजगार निर्मितीसाठी केलेले प्रयत्न, बचत गटांच्या माध्यमातून उभारलेले प्रकल्प, शेतकरीकंपन्या, सामूहिक शेती उदयोन्मुख नेतृत्व : कुठलीही पार्श्वभूमी नसताना गावाच्या विकासात नावीन्यपूर्ण सहभाग देत असलेला तरुण सरपंच.कृषी तंत्रज्ञान : शेतीतील तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर, सेंद्रीय शेती

सरपंच आॅफ द इयरविविध क्षेत्रात सर्वांगीण योगदान देणा-या सरपंचास ‘सरपंच आॅफ द इयर’ अवॉर्डने गौरविले जाईल.

अधिक माहितीसाठी www.lokmatsarpanchawards.inसंपर्क - 9923378476/9920179282‘बीकेटी’ उद्योग समूह हा नेहमी समाजात मोठे काम करत असलेल्या मात्र समाजाला अपरिचित असलेल्या व्यक्तिमत्वांच्या पाठिशी राहिलेला आहे. आमचे संस्थापक दिवंगत महाबीर प्रसाद पोद्दार यांनी अशा दडलेल्या मोत्यांचा शोध घेत त्यांना नेहमी प्रोत्साहित केलेले आहे. त्यांचा वारसा जपत ‘लोकमत’च्या सोबतीने ‘बीकेटी’ समूह ही पुरस्कार योजना राबवत आहे. गावांचा कायापालट घडविलेल्या सरपंचांचा शोध या मोहिमेत घेतला जात आहे. या सरपंचांच्या कहाण्या व त्यांनी राबविलेले उपक्रम इतरांना प्रेरणा देतील व गावांच्या विकासाची चळवळ आणखी समृद्ध होईल, अशी यामागची भावना आहे. ग्रामीण महाराष्टÑातील नवीन हिरोंचा परिचय यातून घडेल.- राजीव पोद्दार, जॉर्इंट मॅनेजींग डायरेक्टर, बीकेटी

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र