शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकालः देशमुख बंधुंचा विजय Sweet, विलासरावांसाठी रितेशचं भावनिक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 19:46 IST

Maharashtra Election Result 2019: अमित देशमुख यांनी भाजपाच्या शैलेश लाहोटी तर धीरज देशमुख यांनी शिवसेनेच्या सचिन देशमुख यांचा पराभव केला आहे.

मराठवाड्यात लक्ष लागलेल्या लातूरमधील लढतीत काँग्रेसच्या दोन्ही उमेदवार बंधूंचा विजय झाला आहे. लातूरमधून अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख यांना विजय मिळाला आहे. अमित देशमुख यांनी 42 हजारांपेक्षा जास्त मतं घेऊन विजय मिळवला. तर धीरज देशमुख 1 लाख 20 हजारांएवढ्या विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. या विजयानंतर दोन्ही देशमुख बंधुंचा तिसरा भाऊ आणि अभिनेता रितेशने भावनिक ट्विट केलंय. 

अमित देशमुख यांनी भाजपाच्या शैलेश लाहोटी तर धीरज देशमुख यांनी शिवसेनेच्या सचिन देशमुख यांचा पराभव केला आहे. आपल्या दोन्ही बंधुंच्या विजयासाठी अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख या जोडीने आपल्या लातूर जिल्ह्यात तळ ठोकला होता. त्यामुळे, साहजिकच या विजयानंतर रितेशकडून भावना व्यक्त होणं अपेक्षित आहे. रितेशन विलारावांचा आठवण काढून एक भावनिक ट्विट केलंय. पापा, आम्ही करून दाखवलं, PAPA We did it असं लिहून रितेशने दोन्ही भावांच्या मतांच्या विजयाची आकडेवारी जाहीर केलीय. त्यासोबतच, लातूरमधील जनतेचे आभार मानले आहेत. आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि श्रद्धेबद्दल आपले आभार असे रितेशने लिहलं आहे. रितेशचं हे ट्विट व्हायरल होत आहे. 

रितेशसह माजी राज्यमंत्री दिलीपराव देशमुख, वैशाली विलासराव देशमुख, लातुर शहर विधानसभेचे उमेदवार माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख, अदिती देशमुख, सिनेअभिनेते रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, लातुर ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार धीरज देशमुख, दिपशिखा देशमुख यांनीही प्रचारात मोठा सहभाग घेतला होता. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख हे लातूर शहर मतदार संघातून तर लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख निवडणूक लढवली. याआधी विलासराव आणि त्यांचे बंधु दिलीपराव देशमुख सोबतच आमदार होते. त्यामुळे या दोघांनाही आमदार होऊन देशमुख कुटुंबातील दोन भाऊ आमदार असण्याची परंपरा कायम राखण्याची संधी मिळाली आहे.  

टॅग्स :Ritesh Deshmukhरितेश देशमुखlatur-rural-acलातूर ग्रामीणAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Dhiraj Deshmukhधीरज देशमुखAmit Deshmukhअमित देशमुख