शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकालः 'माझा धनु जिंकला'... धनंजय मुंडेंच्या विजयानंतर मातोश्रींना अश्रू अनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 11:39 IST

Maharashtra Election Result 2019: राज्याचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्यातील हाय व्होल्टेज लढत ठरलेल्या परळी मतदारसंघात पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला.

मुंबई - परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडेंचा विजय झाला. धनंजय मुंडेंनी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना सत्याचा विजय झाल्याचे म्हटले आहे. राज्यातील हाय व्होल्टेज विधानसभा मतदारसंघात अखेर भावाने बाजी मारली आहे. पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला. विजयानंतर आपल्या कार्यर्त्यांसह धनंजय मुंडेंनी घर गाठलं. त्यावेळी मुंडेंसह त्यांच्या आईंनाही अश्रू अनावर झाले होते. माझा धनु जिकंला, माझा धनु निवडणूक आला म्हणत धनंजय मुंडेंच्या मातोश्रींना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यावेळी, धनंजय मुंडेंनी आईला जादू झप्पी देताना वातावरण अतिशय भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

राज्याचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्यातील हाय व्होल्टेज लढत ठरलेल्या परळी मतदारसंघात पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला. धनंजय मुंडेंनी परळी मतदारसंघातून विजय मिळवला. धनंजय यांनी सुरुवातीपासूनच मतांची आघाडी घेतली होती. निवडणूक प्रचारातील आरोप प्रत्यारोपामुळे परळी मतदारसंघातील लढत राज्यात चर्चेचा विषय बनली होती. धनंजय मुंडेंच्या व्हायरल क्लिपनंतर पंकजा यांना आलेली भोवळ आणि त्यानंतर बदललेलं राजकीय वातावरण परिणामकारक ठरेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, पंकजा यांच्या भावनिक राजकारणाला जनतेनं लाथाडत निवडणुकीत धनंजय मुंडेंना कौल दिला. धनंजय मुंडेंनी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना, सत्यमेव जयते असे आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन लिहिले. आपल्या विजयानंतर कार्यकर्त्यांच्या गर्दीसह धनंजय मुंडेंनी घरचा रस्ता धरला. अंगावर पडलेला गुलाल, घामानं भिजलेलं शरीर, कपाळी लागलेला विजयी टीळा आणि हजारो कार्यकर्त्यांची फौज घेऊ धनुभाऊ आपल्या आईंच्या दर्शनासाठी, माऊलीच्या आशीर्वादासाठी परळीतील आपल्या निवासस्थानी गेले. त्यावेळी, कित्येकांना आपल्या डोळ्यातील अश्रू थांबवता आले नाहीत. विजयी मिरवणूक घेऊन आलेल्या आपल्या धनंजय मुंडेंना पाहाता, त्यांच्या मातोश्रींनी अश्रूंना वाट मोकळी केली. माझा धनु जिंकला म्हणत आईंच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यावेळी, हा भावूक क्षण पाहून अनेकांचे डोळे पाणावले. यावेळी, धनंजय मुंडेंचे वडील पंडित अण्णांच्या आठवणीही नकळत जागल्या. माय-लेकाच्या भेटीचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावरही हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.  दरम्यान, आपल्या पराभवानंतर पंकजा यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना, 'अनाकलनीय' असं वर्णन केलंय. परळी शहरातून 18 हजारांवर मताधिक्क्य धनंजय मुंडे यांना मिळाले.

परळी मतदार संघातील ग्रामीण भागातून मताधिक्क्य तर मिळालेच परंतु शहरातूनही मताधिक्क्य मिळाल्याने धनंजय मुंडेंचा मोठा विजय झाला. धनंजय मुंडे यांचा प्रत्येक कार्यकर्त्यांशी चांगला संवाद असल्याने व समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून पाच वर्ष काम केल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांना यश प्राप्त करता आले. धनंजय मुंडेंनी परळी विधानसभा मतदार संघातील अनेक गावात जाहिर सभा, मतदारांच्या गाठीभेटी घेवून संवाद साधला होता. हा संवादही धनंजय मुंडेंच्या कामाला आला. राष्ट्रवादी काँग़्रेसच्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी व काँग्रेसचे माजी राज्यमंत्री पंडीतराव दौंड, संजय दौंड व काँग्रेसचे इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जीव तोडून मेहनत घेतली. धनंजय मुंडेंची विकासासाठी असलेली तळमळ पाहून मतदारांनी धनंजय मुंडे यांच्या पारड्यात मते टाकली. परळी नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात विकासाच्या कामाला त्यांनी प्राधान्य दिले. पंचायत समितीच्या माध्यमातूनही ग्रामीण भागात कामे केली. या विकास कामाचीही त्यांना मदत झाली. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेparli-acपरळीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019