शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात सीटबेल्ट वापरण्याचे प्रमाण १३ टक्क्यांनी वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 07:09 IST

नवीन मोटार वाहन कायद्याचा परिणाम; मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील चालकांनाही लागले वळण, सेव्ह लाइफ फाउंडेशनचे सर्वेक्षण

मुंबई : वाहन चालविताना सीटबेल्ट घालण्याबाबत अनेकदा जनजागृती करूनही वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करत होते. नवीन मोटार वाहन कायदा लागू होण्यापूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर ८२ टक्के बस चालक सीटबेल्ट वापरत नव्हते. कायदा लागू झाल्यानंतर हे प्रमाण ४१ टक्क्यांपर्यंत घटले आहे. सेव्ह लाइफ फाउंडेशन या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून हे समोर आले आहे. नवीन मोटार वाहन कायद्यानुसार वाहतुकीच्या नियामांचे उल्लंघन केल्यास यापूर्वीच्या दंडाच्या रकमेत मोठी वाढ केल्याने आता वाहनचालक नियम पाळू लागल्याची चर्चा आहे.दिल्ली येथील बुरारी, भालसवा आणि मुकुंदपूर चौक तसेच मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे व जुना-मुंबई पुणे हायवेचा सेव्ह लाइफ फाउंडेशन या संस्थेच्या वतीने अभ्यास करण्यात आला होता. महाराष्ट्र आणि दिल्लीत नवीन वाहन कायदा लागू होण्यापूर्वी ११९० वाहनांचे निरीक्षण करण्यात आले. तर कायदा लागू झाल्यानंतर १,२९४ वाहनांचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये सीटबेल्टचा वापर न करणे, क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणे, हेल्मेट न वापरणे, अत्यावश्यक वाहनांना जागा न देणे, फोनवर बोलणे आदी बाबींचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व वाहनांमध्ये सरासरी सीटबेल्ट वापरण्याचे प्रमाण १३ टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले. यामध्ये बसचालकांचे प्रमाण ५० टक्क्यांहून ७६ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर ट्रक चालकांमध्ये सीटबेल्ट वापरण्याचे प्रमाण २१ टक्के वाढले आहे.नवीन कायदा लागू होण्यापूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर ८२ टक्के बसचालक सीटबेल्ट वापरत नव्हते. कायदा लागू झाल्यानंतर हे प्रमाण ४१ टक्क्यांपर्यंत घटले. अवैध प्रवासी वाहतूक करण्याच्या घटनांमध्ये ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ८० टक्के कारचालक सीटबेल्ट वापरत नव्हते. कायदा लागू झाल्यावर त्यामध्ये ५ टक्क्यांनी घट झाली. कारमध्ये अवैध प्रवासी वाहतूक होत होती. ती आता १० टक्क्यांवरून १ टक्क्यापेक्षाही कमी झाली आहे. ट्रकमध्ये प्रमाणापेक्षा जास्त मालवाहतूक करण्याचे प्रमाण १३ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आले. तर सीटबेल्ट वापरण्याचे प्रमाण १३ टक्क्यांवरून ३.३ टक्क्यांवर आले आहे. जुन्या मुंबई-पुणे हायवेवर सीटबेल्ट वापरण्याचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढले आहे तर अवैध मालवाहतूक २ टक्क्यांनी कमी झाली आहे.हेल्मेट घालणाऱ्यांमध्येही वाढकार चालकांवर कायद्याचा विशेष परिणाम जाणवला नाही. तर, १० टक्के ट्रक चालकांमध्ये सुधारणा पाहायला मिळाली. दिल्लीमध्ये नवीन कायदा लागू झाल्यानंतर बुहारी चौकात सीटबेल्ट वापरण्याचे प्रमाण १५.६ टक्क्यांनी वाढले. ८८ टक्के बसचालकांनी सीटबेल्ट वापरण्यास सुरुवात केली. भालसवा चौकात हेल्मेट वापरण्यात १० टक्के वाढ झाली. दुचाकीवर अवैध मालवाहतूक करण्याचे प्रमाण २ टक्क्यांनी घटले तर बसमध्ये हे प्रमाण १० टक्क्यांनी घटले.