शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

स्टार्टअप ईकोसिस्टीममध्ये महाराष्ट्र अव्वल; केंद्र सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 09:15 IST

११,३०८ मान्यताप्राप्त स्टार्टअप्ससह महाराष्ट्र अव्वल

मुंबई : सध्या उद्योग जगतात स्टार्टअप व युनिकाॅर्न परवलीचा शब्द बनला आहे. विशेष म्हणजे यातही महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे केंद्र सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालने सिद्ध केले. ११,३०८ मान्यताप्राप्त स्टार्टअप्ससह महाराष्ट्र अव्वल आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. ज्या कंपनीचे मूल्यांकन ७,५०० कोटी ते ७५ हजार कोटी आहे त्यांना स्टार्टअप युनिकाॅर्न संबोधले जाते. देशभरातील एकूण ४४ पैकी ११ युनिकाॅर्न एकट्या महाराष्ट्रात आहेत. यासंदर्भात मलिक म्हणाले की, राज्यात ३२,६६२ नोंदणीकृत स्टार्टअप असून त्यापैकी ११,७०५ स्टार्टअप हे मान्यताप्राप्त आहेत. देशभरातील मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या ६२ हजार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान ५ ते ७ मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. अगदी दुर्गम अशा गडचिरोलीतही ३० नोंदणीकृत आणि ९ मान्यताप्राप्त तर नंदुरबारमध्ये ३२ नोंदणीकृत आणि ११ मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. मुंबई महानगर प्रदेशात १४,७१० नोंदणीकृत तर ५,९३८ मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत. पुण्यामध्ये ८,६०३ नोंदणीकृत तर ३,३७५ मान्यताप्राप्त, औरंगाबादमध्ये ७७४ नोंदणीकृत तर २२० मान्यताप्राप्त, सिंधुदुर्गमध्ये ३६ नोंदणीकृत तर १४ मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत.साेसायटीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य नावीन्यपूर्ण स्टार्टअप धोरण जाहीर केले आहे. धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नावीन्यता  सोसायटी कार्यरत आहे. धोरणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या सोसायटीमार्फत विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. यात स्टार्टअप वीक, इनक्युबेटर्सची स्थापना, स्टार्टअप आणि नावीन्यपूर्ण यात्रा, ग्रँड चॅलेंज, हॅकॅथॉन अनेक उपक्रमांची राबवले जात आहे. महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीच्या माध्यमातून राज्यातील अनेक नवउद्योजकांना उद्योजकतेशी निगडीत विविध प्रकारचे साहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध होत आहे.