शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 19:27 IST

महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने २०१७ च्या नर्मद पारितोषिक, जीवन गौरव पारितोषिक आणि वाङमय पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.

मुंबई, – महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने २०१७ च्या नर्मद पारितोषिक, जीवन गौरव पारितोषिक आणि वाङमय पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. सन २०१७ चा कवी नर्मद गुजराती साहित्य पुरस्कार जेष्ठ साहित्यिक  रतिलाल बोरीसागर यांना घोषित झाला असून साहित्य पुरस्कार साहित्यिक आबिद सुरती,कला पुरस्कार श्री.गौतम जोशी, पत्रकारिता पुरस्कार श्री.शिरीष मेहता व संस्था पुरस्कार भवन्स कल्चरल सेंटर, अंधेरी यांना घोषित झाला आहे.

१० ऑक्टोबर, २०१७ रोजी सायंकाळी ७.०० वाजता गिरगांव चौपाटी येथील भारतीय विद्याभवन येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या सोहळ्यास उद्योग मंत्री श्री.सुभाष देसाई,डॉ.जे.जे.रावल, खासदार श्री.अरविंद सावंत,आमदार श्री.मंगलप्रभात लोढा आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणा-या वाङमय पुरस्कारामध्ये चुनीलाल मडिया पुरस्कार (नवलकथा) प्रथम पुरस्कार श्रीमती वर्षा अडालजा आणि श्रीमती सोनल परीख यांना संयुक्तरित्या घोषित करण्यात आला आहे. तर व्दितीय पुरस्कार श्रीमती मालती कापडिया यांना जाहीर झाला आहे. नाटक विभागात देण्यात येणारा प्रबोध जोशी पुरस्कार श्री.उत्तम गडा यांना घोषित झाला आहे. तर निबंध विभागातील वाडिलाल डगली पुरस्कार श्री.दिपक मेहता आणि श्रीमती तारिणीबहेन देसाई यांना संयुक्तरित्या घोषित करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी अन्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.