शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

Maharashtra SSC Results 2018 : राज्यातील १२५ विद्यार्थांचे शतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 15:11 IST

बेस्ट आॅफ फाइव्ह पध्दतीने राज्यातील १२५ विद्यार्थांना १०० टक्के गुण मिळविण्यात यश आले आहे. 

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च/एप्रिल २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल ८९.४१ टक्के लागला आहे. बेस्ट आॅफ फाइव्ह पध्दतीने राज्यातील १२५ विद्यार्थांना १०० टक्के गुण मिळविण्यात यश आले आहे. दहावीच्या निकाला मध्ये लातूर पॅटर्नला पुन्हा चांगले यश मिळाले आहे. शंभर टक्के गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांमध्ये लातूर विभागातील सर्वाधिक ७० विद्यार्थी असून त्यापाठोपाठ औरंगाबादमधील २३, कोल्हापूर ११, पुण्यामधील ४, अमरावती ६, कोकण ४, नागपूर २, नाशिक १ विद्यार्थी आहे. राज्यातील एकूण १२५ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.  दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात अव्वल राहण्याची परंपरा मुलींनी कायम राखली असून मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.९७ तर मुलांची ८७.२७ इतकी आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ४.७० टक्क्यांनी जास्त आहे.

राज्य मंडळाच्या अध्यक्ष शंकुतला काळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये दहावीचा निकाल जाहीर केला. राज्यातून १६ लाख २८ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती, त्यापैकी १४ लाख ५६ हजार २०३ विद्यार्थी (८९.४१ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.  मागील वर्षी दहावीचा निकाल ८८.७४ टक्के लागला होता, त्यातुलनेत यंदाच्या निकालात ०.६७ टक्क्यांची वाढ झाली आहे.

राज्यातील ९ विभागीय मंडळांमध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ९६ टक्के इतका लागला आहे तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ८५. ९७ टक्के इतका लागला आहे. मुंबई ९०.४१, कोकण ९६, पुणे ९२.०८, नाशिक ८७.८२, नागपूर  ८५.९७, कोल्हापूर ९३.८८, अमरावती ८६.४९, औरंगाबाद ८८.८१, लातूर ८६.३० अशी विभागनिहाय निकालाची टक्केवारी आहे. राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ८६.८७ टक्के इतका लागला आहे.

मागील वर्षी १९३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले होते, यंदा १२५ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळविण्यात यश मिळाले आहे. कला व क्रीडाच्या अतिरिक्त २५ गुणांच्या जोरावर १०० टक्के गुण मिळविण्यात विद्यार्थ्यांना यश मिळते आहे. ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांची संख्या ६३ हजार ३३१ इतकी आहे. तर ३५ ते ४५ टक्क्यांदरम्यान गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ९९ हजार २६२ इतकी आहे. ४ लाख ३ हजार १३७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ५ लाख ३८ हजार ८९० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

यंदाच्या दहावीच्या परीक्षेत कॉपीचे गैरप्रकार करणाºया ६६१ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मंडळाकडून एकूण ५७ विषयांची परीक्षा घेण्यात आली होती, त्यापैकी ११ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८