शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नवा पेच! निलंबनाची नोटीस असताना एकनाथ शिंदेंचा शपथविधी कसा?; शिवसेनेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 13:24 IST

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं. राज्यपाल घटनाबाह्य वागतात असा आरोप शिवसेनेने केला आहे.

मुंबई - राज्याच्या सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपानं शिंदे गटाच्या ५० आमदारांना पाठिंबा देत राज्यात बंडखोरांचे सरकार स्थापन केले. गुरुवारी राजभवनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला. परंतु आता शिंदे सरकारसमोर नवा कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. निलंबनाची कारवाई असताना एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला कसा? असा सवाल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी विचारला आहे. 

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार अरविंद सावंत म्हणाले की, मुख्यमंत्रिपद शिवसेनेला द्यावं हीच मागणी उद्धव ठाकरे करत होते. मात्र भाजपाने अडीच वर्षापूर्वी ते केले नाही. मात्र आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं. राज्यपाल घटनाबाह्य वागतात. शपथविधीला सर्वात मोठ्या पक्षाला बोलवलं जातं. मग एकनाथ शिंदेंना काय म्हणून बोलावलं. निलंबनाची नोटीस असताना शपथविधी कसा झाला? अपात्रतेची कारवाई होण्याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका आहे. ११ जुलैला सुनावणी होणार आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

त्याचसोबत मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यानंतर दिल्लीवरून फोन आल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पक्षाच्या आदेशाचा मान देवेंद्र फडणवीसांनी राखला पण हीच पक्षशिस्त एकनाथ शिंदे यांच्यात कुठे आहे? असं सांगत अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. 

...त्यामुळे उद्धव ठाकरेंची प्रतिमा मलिन होतेय एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याचा आनंद सगळ्या शिवसैनिकांना आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आजूबाजूचे लोक चुकीचं मार्गदर्शन करतात. शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय ते स्वीकारलं पाहिजे. परंतु कुठेतरी अडवायचं त्यासाठी केले जातेय. परंतु यामुळे उद्धव ठाकरेंची प्रतिमा मलीन होतेय. उद्धव ठाकरेंच्या स्वभावाबाबत नाराजी नाही. परंतु दुसऱ्याबाजूला मृतदेह येतील, घाण, डुकरं बोलले गेले. एकीकडे गटनेतेपदावरून काढायचं, आमच्याविरोधात आक्षेपार्ह बोलायचं हे कोण ऐकून घेईल असा सवाल शिंदे गटाचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी विचारला आहे. 

तसेच कायदेशीर लढाईला आम्ही पूर्णपणे तयार आहोत. परंतु आता हे वाद संपले पाहिजेत. महाराष्ट्राला नवी दिशा देण्याचं काम झाले पाहिजे. तुम्ही विकासाच्या गोष्टी कुठे करतायेत. सत्तास्थापन झाली आता भांडणं संपवली पाहिजे. मतभेद विसरून राज्याचा विकास करायला हवा असंही शिरसाट यांनी सांगितले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस