शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: देवेंद्र फडणवीसही कुठे गायब झाले? 'योगा'ला दांडी मारून पहाटेच दिल्लीला निघाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 10:41 IST

Eknath Shinde News: एकनाथ शिंदे गायब झालेले असताना दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील गायब झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये भूकंप होण्याची शक्यता असताना शिवसेनेतच एकनाथ शिंदे यांनी मोठा भूकंप घडवून आणला आहे. रातोरात शिवसेनेच्या निम्म्या आमदारांना घेऊन ते सूरतला गेले आहेत. दुसरीकडे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीचे नेते विजयाचा जल्लोष करण्यात व्यस्त असताना शिंदेंनी मविआच्या बुडाखाली सुरुंग पेरल्याने त्याचा हादरा गल्लीपासून दिल्लीपर्यंत बसला आहे. 

एकनाथ शिंदे गायब झालेले असताना दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील गायब झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. नाशिकमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमाला फडणवीस जाणार होते. परंतू ते तिथे पोहोचलेच नाहीत. त्र्यंबकेश्वर येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने सद्गुरु मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी फडणवीस रात्रीच येणार होते.  मात्र, ते आलेच नाहीत. 

राज्यात एवढी मोठी घडामोड घडत असताना फडणवीस कुठेत, याची चर्चा सुरु झाली. यावर फडणवीस यांनी पहाटेच मुंबई सोडल्याचे समोर आले. फडणवीस हे सकाळीच दिल्लीला रवाना झाले. शिंदे यांचे बंड शमले नाही तर राज्यात सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, एकनाथ शिंदे हे आज दुपारी सूरतमध्येच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे वृत्त आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे राज्यातील राजकारणात भूकंप झाला असून, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातच एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार वास्तव्य करून असलेल्या हॉटेलबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक