शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस सज्ज - सतीश माथूर

By admin | Updated: October 5, 2016 14:13 IST

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त होत असतानाच या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दल सज्ज असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत 

नाशिक, दि. ५ - काश्मिरमधील उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरमध्ये  घुसून ‘सर्जिकल स्ट्राईक’द्वारे दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले़ त्यामुळे मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची भीती गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे़ या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दल सज्ज असून सागरी सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. तसेच फोर्स वन, एटीएस, एटीसी, क्युआरटी व आरसीपी जवान राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिली़ महाराष्ट्र पोलीस अकादमीतील ११४ व्या तुकडीच्या दीक्षान्त समारंभानंतर आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते़

राज्याच्या सीमा सुरक्षिततेच्या मुद्दयावर माथुर यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकार व पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर सीमा सुरक्षिततेबाबत गंभीर आहे़ मुंबईमधील सागरी सुरक्षिततेसाठी पोलीस दलास ७० नवीन बोटी मिळाल्या असून याठिकाणी फोर्स वनचे कमांडो तैनात आहेत़ तसेच कोणत्याही आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी क्युआरटी, आरसीएफ टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत़ या तिन्ही विभागातील जवांनांकडे अत्याधुनिक शस्त्रे असून सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली आणखी काही शस्त्रे व साहित्य विकत घेण्याची प्रक्रि या येत्या एक-दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे. 
मुंबईतील सागरी तळांच्या सुरक्षिततेसाठी चार नवीन सागरी पोलीस ठाण्यांना मंजुरी मिळाली आहे़  एनएसजी, बीएसएफ व गुप्तचर यंत्रणांसोबत नियमित बैठका सुरू असून चांगला समन्वय साधला जातो आहे़  राज्यांतर्गत सुरक्षेसाठी विभागीय बैठका तर सीमा व सागरी सुरक्षेबाबत आठ दिवसांपुर्वीच अहमदाबाद येथे राज्यस्तरीय बैठक झाली होती़ राज्यातील दहशतवादी कारवाई वा हालचालींवर नजर ठेवण्यासाठी दहशतवाद विरोधी पथक तसेच पोलीस ठाणे स्तरावर असलेल्या एटीसी विभागाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत़ पोलिसांचे नेटवर्किंगमध्ये चांगलीच सुधारणा झाली असून सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभुमीवर सतर्क  असल्याचे माथूर यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
 
पोलिस कर्मचा-यांच्या आरोग्याची दरवर्षी तपासणी
पोलिसांवरील कामाचा वाढता ताण त्यातून उद्भवणाºया आरोग्याची समस्या कमी व्हाव्यात यासाठी दरवर्षी पोलिसांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे़ तसेच आजारपणातील तपासणी अहवालाचे जतन केले जाईल़ कामावरील ताण कमी करण्यासाठी वर्षभरातून एकदा सहकुटुंब सहलीसाठी सुटी दिली जाईल़ या सुटीसाठीचा खर्च पुर्वी पोलीस कुटुंब कल्याण मंडळातर्फे केला जात होता तो आता सरकाररने करावा अशी मागणी केली जाणार आहे़ पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंब सहलींसाठी औरंगाबाद, पुण्यासह विविध ठिकाणावरील ‘हॉलिडे होम’ येत्या जानेवारीपासून सुरू होणार आहेत़