शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
4
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
5
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
6
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
7
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
8
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
9
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
10
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
11
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
12
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
13
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
14
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
15
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
16
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
17
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
18
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
20
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी

‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेचा निकाल जाहीर, ‘लोकमत’च्या सुशील कदम, प्रशांत खरोटेंना पारितोषिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 03:42 IST

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला आहे. या स्पर्धेत कोल्हापूरच्या वेदांत कुलकर्णी व दीपक कुंभार यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकावर बाजी मारली आहे.

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला आहे. या स्पर्धेत कोल्हापूरच्या वेदांत कुलकर्णी व दीपक कुंभार यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकावर बाजी मारली आहे. तर मुंबईच्या अंशुमन पोयरेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. ‘लोकमत’ मुंबईचे छायाचित्रकार सुशील कदम आणि नाशिक आवृत्तीचे छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावण्यात यश मिळवले आहे.या स्पर्धेत प्रमुख तीन पारितोषिकांसह पाच उत्तेजनार्थ विजेते निवडण्यात आले आहेत. त्यातील उत्तेजनार्थ पारितोषिकांत उस्मानाबादचे राजेंद्र धाराशिवकर, बुलडाण्याचे सुनील बोर्डे, पुण्याचे उमेश निकम यांचा समावेश आहे. माहिती व जनसंपर्कचे सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी गुरुवारी हा निकाल जाहीर केला. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रकारांना अनुक्रमे २५, २० आणि १५ हजार रुपयांचे, तर उत्तेजनार्थ पाच पारितोषिकांसाठी प्रत्येकी ३ हजार रुपये प्रदान केले जाणार आहेत.दरम्यान, प्राप्त छायाचित्रांतून विजेत्यांची निवड आणि प्रदर्शनासाठी दर्जेदार छायाचित्रांची निवड करण्यासाठी ब्रिजेश सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कामकाज पाहिले. या समितीत संचालक (प्रशासन) अजय अंबेकर, संचालक (माध्यम समन्वयक) शिवाजी मानकर, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर, ज्येष्ठ छायाचित्रकार नितीन सोनवणे, संजय पेठे, अनिल छड्डा यांचा समावेश होता.राज्याचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी एकूण ३ हजार २१० छायाचित्रे प्राप्त झाली होती. त्यातील दर्जेदार छायाचित्रांचे राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार असून प्रदर्शनाची सुरुवात नागपूर येथून होणार आहे. राज्यभरात या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे, असे महासंचालनालयाने सांगितले आहे.