शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

Municipal Election 2025: मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 07:32 IST

Maharashtra Municipal Election: राज्य सरकारने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मंगळवारी सरकारने मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपरिषद, नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केले आहेत.

Maharashtra Civic Polls - राज्य सरकारने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मंगळवारी सरकारने मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपरिषद, नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार मुंबईत महापालिका आयुक्त हे प्रभागरचना करणार आहेत. मुंबईत २२७ प्रभाग निश्चित करण्यात आले असून एक प्रभाग पद्धत असणार आहे. लोकसंख्येच्या आधारे ही प्रभाग रचना केली जाणार आहे.  यामुळे २७ महानगरपालिकांसाठी प्रभाग रचना प्रक्रिया गतिमान हाेईल.

अधिकार कुणाला?अ वर्ग - पुणे, नागपूर, ब वर्ग - ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, क वर्ग - नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली या महानगरपालिकांतील प्रभागरचनेचे प्रारूप तयार करण्याची जबाबदारी महानगरपालिका आयुक्तांची असेल.  ड वर्ग महानगरपालिकांच्या  प्रभागरचनेचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतील. यामध्ये मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल या महानगरपालिकांचा समावेश आहे. या महानगरपालिकांमध्ये प्रभागांची संख्या ठरवताना सर्व प्रभाग चार सदस्यांचे करायचे आहेत. 

कोणते सूत्र वापरले जाणार?प्रभाग रचना जनगणनेच्या लोकसंख्येच्या आधारे होईल. सरासरी लोकसंख्या ठरविण्यासाठी एकूण लोकसंख्या भागिले एकूण सदस्यसंख्या गुणिले प्रभागातील सदस्यसंख्या हे सूत्र वापरले जाईल. रस्ते, नद्या, रेल्वे मार्ग यासारख्या नैसर्गिक सीमा विचारात घेतल्या जातील. कोणत्याही इमारतीचे विभाजन दोन प्रभागांत होणार नाही. 

नगरपरिषद व नगरपंचायतींचे काय? नगरपरिषद व नगरपंचायतींच्या प्रभागरचनेचे अधिकार मुख्याधिकारी यांच्याकडे असतील. नगरपरिषदांच्या प्रभागांची संख्या ठरविताना सर्व प्रभाग २ सदस्यांचे करायचे आहेत. सर्वच प्रभाग दोन सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग तीन सदस्यांचा होईल. नगरपंचायतींची प्रभागसंख्या १७ असेल व प्रत्येक सदस्यास एक प्रभाग निश्चित करण्यात यावा, असेही आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाElectionनिवडणूक 2024Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक २०२५