शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Minister Portfolios: CM शिंदेंचा दे धक्का; आदित्य ठाकरेंकडे असणाऱ्या पर्यावरण खात्याची जबाबदारी कुणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 18:34 IST

Maharashtra Minister Portfolios: आज झालेल्या खाते वाटपात मुख्यमंत्र्यांकडे 10 पेक्षा अधिक खाती, तर फडणवीसांकडे 7 खात्यांचा कार्यभार देण्यात आला आहे.

मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. या विस्तारानंतर खातेवाटपाबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. भाजप स्वतःकडे महत्वाची खाती ठेवणार, हे आधीच बोलले जात होते. झालेही तसेच, भाजपने अनेक महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरेंकडे असलेल पर्यावरण खाते कोणाकडे गेले, याबाबत अनकांना उत्सुकता आहे.

आज झालेल्या खातेवाटपानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे पर्यावरण खाते ठावले आहे. पूर्वी हे खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच आदित्य ठाकरेंनी मुंबईतील आरेमधील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली होती. त्यांच्या या निर्णयाने भाजपला मोठा धक्का मानला जात होता. पण, आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच त्यांनी आरेमध्येच मेट्रो कारशेड प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. यातच मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण खाते स्वतःकडे ठेवून आदित्य ठाकरेंना एकप्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

मुख्यमंत्र्यांकडे 10 पेक्षा अधिक खातीआज झालेल्या खातेवाटपानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभागांची जबाबदारी असणार आहे. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAditya Thackreyआदित्य ठाकरे