शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : "माझ्या नादी लागू नका, तुमचा कार्यक्रमच लावणार, सोडणार नाही"; मनोज जरांगेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 12:26 IST

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : निवडणुकीच्या निकालावर मनोज जरांगे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली आहे. सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा जवळपास ७ हजार मतांनी पराभव केला. विविध कारणामुळे निवडणूक काळात राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या या मतदारसंघाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. बीडमध्ये अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी वाजली आहे. या विजयानंतर बजरंग सोनवणे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत जनतेचे आभार मानले आहेत.

निवडणुकीच्या निकालावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्या नादी लागू नका, तुम्ही गोडीगुलाबीने तुमचं काम करा. जर तुम्ही हे नाही दिलं तर मात्र मी २८८ उमेदवार महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे उभे करणार. तुमचा कार्यक्रमच लावणार, सोडणार नाही" असं म्हणत इशारा दिला आहे. "मराठ्यांची भीती निर्माण झाली हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आरक्षण देऊन त्यांना किंमत आणणार आहे. पुढचा विषय कोण निवडून आलं आणि कोण पडलं? तर त्यात कुठे आम्हाला आनंद आहे... नाहीच आहे."

"आमच्या आरक्षणाच्या गुलालात आम्हाला आनंद"

"राजकारण हा माझा मार्ग नाही आणि माझ्या समाजाचाही नाही. त्या गुलालात आम्हाला आनंद नाही, आमच्या आरक्षणाच्या गुलालात आम्हाला आनंद आहे.  मी राजकारणात नाही. कोणालाही पाडा असं म्हटलेलं नाही. आम्ही काय सांगितलं, कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणा पण यावेळेस असं पाडा की मराठ्यांच्या मतांची भीती वाटली पाहिजे. समाजाने ठरवलं आणि त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी होती."

"माझ्या नादी लागू नका"

"माझ्या नादी लागू नका, तुम्ही गोडीगुलाबीने तुमचं काम करा. जर तुम्ही हे नाही दिलं मग मात्र मी २८८ उमेदवार महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे उभे करणार. तुमचा कार्यक्रमच लावणार, सोडणार नाही. आम्ही सर्वांना सोबत घेऊन बनवणार, गोरगरिबांसाठी बनवणार. ८ जूनला आमरण उपोषणाला बसत आहे. तुम्ही तातडीने, तत्काळ निर्णय घ्या. मी जाहीरपणाने पुन्हा एकदा सांगतो मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस साहेबांना की, तुम्ही आमचा हक्क आम्हाला देऊन टाका" असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

निवडणूक जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देत असताना पत्रकारांनी बजरंग सोनवणे यांना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयीही प्रश्न विचारला. जरांगे पाटील फॅक्टर तुमच्या मतदारसंघात कामी आला का? या प्रश्नावर बोलताना सोनवणे म्हणाले की, "१०० टक्के हा फॅक्टर कामी आला. मराठा आरक्षण चळवळीचा मला फायदा होईल आणि या आरक्षणाचा प्रश्न मी संसदेत मांडणार, असंच मी सुरुवातीपासून बोलत आहे." 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे