शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

How to get E-Pass: जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी आता ई-पास गरजेचा; जाणून घ्या कसा मिळवायचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 15:37 IST

How to get E-Pass know the process: ब्रेक द चेन अंतर्गत लागू असलेले निर्बंध वाढले; जिल्हांतर्गत प्रवासासाठी आता ई-पास गरजेचा

मुंबई: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य शासनानं पुन्हा एकदा काही कठोर पावलं उचण्यास सुरुवात केली. सरकारनं 'ब्रेक दि चेन'अंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर केले आहेत. यासोबतच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे आता जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना ई पास आवश्यक असेल. रितसर अर्ज करून ई-पास मिळवता येईल. काही महत्त्वाच्या कारणासाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यासच नागरिकांनी ई- पासचा वापर करावा असं आवाहन राज्यातील पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे. 

कसा मिळवायचा ई- पास? - ई- पास मिळवण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. - त्यानंतर 'apply for pass here'  पर्याय निवडा.  - पुढे तुम्हाला ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडा. - आवश्यक कागदपत्र इथं जोडा. - प्रवास करण्यासाठीचं अत्यावश्यक कारणही नमूद करावं. - कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन ती फाईल अपलोड करावी. - अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करुन अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे हे तुम्ही जाणू शकता. म्हणजेच तुम्हाला अर्जाचं स्टेटस तपासता येईल. - पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तोच टोकन आयडी वापरुन तुम्ही ई- पास डाऊनलोड करु शकता. - या ई-पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल. - प्रवास करतेवेळी पासची मूळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत बाळगा. जेणेकरुन पोलिसांनी विचारलं असता, त्यांना हा पास दाखवता येऊ शकतो. 

ई- पासबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे-- अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणीबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.- अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांना आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई- पासची गरज नाही. - कोणतीही व्यक्ती किंवा त्यांचा समूह या पाससाठी अर्ज करु शकतो. - ज्यांना ऑनलाईन सेवेसाठीचा अॅक्सेस मिळत नाही, अशा व्यक्तींनी ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नजीकच्या पोलीस स्थानकाला भेट द्यावी.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या