शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रावर ९ लाख कोटीचे कर्ज आता जीएसटी कपातीचा राज्याला फायदा की तोटा?; आकडे सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 07:53 IST

विविध क्षेत्रांतील उत्पादन, विक्रीही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

मुंबई - केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराची (जीएसटी) द्विस्तरीय कररचना अमलात आणल्यामुळे राज्य सरकारच्या महसुलात सात टक्के म्हणजे जवळपास १० ते १२ हजार कोटी रुपये वार्षिक घट होण्याची शक्यता आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रात ७ हजार कोटी आणि इलेक्ट्रॉनिक आणि इतर सेवा क्षेत्रात जवळपास पाच हजार कोटी रुपयांचे उत्पन्न कमी होईल, असा अंदाज आहे. मात्र, दुसरीकडे बाजारपेठेत खरेदी-विक्री प्रचंड वाढून अधिकचा महसूल राज्य सरकारला मिळेल, असा विश्वास सरकारी पातळीवर व्यक्त होत आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याच्या अर्थव्यवस्थेला आता मोठी गती मिळेल. विविध क्षेत्रांतील उत्पादन, विक्रीही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. दरम्यान, वार्षिक १.७६ लाख कोटी हे जीएसटीद्वारे अपेक्षित असताना जुलैअखेर ५७,९७० कोटी प्राप्त झाले.

आकडे काय सांगतात...जीएसटी आणि विक्री करातून २०२४-२५ या वित्तीय वर्षात २ लाख ४६ हजार कोटी रुपये मिळतील आणि आधीच्या वर्षाच्या तुलनेत २० टक्के वाढ झालेली असेल असे उद्दिष्ट राज्य सरकारने समोर ठेवले होते. 

‘रोडमॅप’चे आव्हानलाडकी बहीण योजनेमुळे एकीकडे विकास कामांना कात्री लागली आहे. कंत्राटदारांची हजारो कोटी रुपयांची बिले थकली आहेत. राज्य सरकारवरील कर्जाचा आकडा नऊ लाख कोटी रुपयांवर गेला आहे. या परिस्थितीत जीएसटीचे हक्काचे १२ हजार कोटी रुपये वर्षाकाठी कमी होणे हा महाराष्ट्रासाठी धक्का असला तरी जीएसटीतील कपात ही संधीमध्ये कशी परावर्तित करता येईल, यासाठीचा रोडमॅप तयार करणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आव्हान असेल.

जीएसटीचे दर कमी केल्याने बाजारपेठेला एकूणच तेजी येऊन अर्थव्यवस्थेला नक्कीच झळाळी येईल. कराचा भार कमी झाला की अर्थव्यवस्थेला बळकटी येते हा जगभरातील अनुभव आहे. - बी. सी. भरतीया, अध्यक्ष, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स.

जीएसटी कमी झाल्याने करचोरी कमी होईल. करांचे ओझे कमी तिथे जगभरातील ग्राहक येतात. दुबई हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. जीएसटीतून महाराष्ट्राला मिळणारा वाटा कमी होणार नाही, उलट अधिक महसूल मिळेल.- ॲड. आशिष जयस्वाल, वित्त राज्यमंत्री.

टॅग्स :GSTजीएसटी