शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: सत्तास्थापनेच्या बैठका सोडून पवार अतिवृष्टीग्रस्तांसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 06:17 IST

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावासही त्यांनी भेट दिली.

योगेश पांडे नागपूर : राज्यात सत्ता स्थापनेसाठी तीन पक्षांच्या बैठका सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र गुरुवारी नागपूरकडे धाव घेतली व परतीच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाची पाहणी केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावासही त्यांनी भेट दिली.पवार यांनी काटोल तालुक्यातील गावांना भेटी देऊन नुकसानाची पाहणी केली. शरद पवार यांच्या दौऱ्याची कुणकुण लागल्याने शेकडो शेतकरी जमले. ‘साहेब शेतकरी अडचणीत आहे, सरकार लवकर स्थापन करा’ अशी भावना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी केली. पंचनामे करण्यास होणारी दिरंगाई, कृषी खात्यातील अधिकाºयांची अरेरावी, संत्री व्यापाºयांची मनमानी, पीक विमा कंपन्यांचे दुर्लक्ष अशा तक्रारींचा पाढाच त्यांनी वाचला. कापूस, सोयाबीन, धान पिकांचे व संत्र्यांचे नुकसान पाहून पवारही व्यथित झाले.राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असली तरी मोठी नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे केंद्र सरकारला मदत करावीच लागेल. दर हेक्टरी मदत व सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी मी पाठपुरावा करत असल्याचे सांगून पवार यांनी शेतकºयांना धीर दिला.अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. कापसाची बोंडे वाढलीच नाहीत व कापूस कुजलेला आहे. संत्री व मोसंबीच्या पिकालाही मार पडला आहे. या संत्र्यांना बाजारात भाव मिळणार नाही. सोयाबीन, धानाचेही नुकसान झाले आहे. ते सोसण्याची त्यांची ताकद नाही. बँका, सोसायटीकडून घेतलेले कर्ज परत करण्यासाठी सरकारने नुकसानभरपाई दिली पाहिजे, असे मत शरद पवार यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.ओल्या दुष्काळातले शेतकºयांचे दु:ख कळावे, व्यथा केंद्र सरकारपर्यंत पोहोचाव्यात म्हणून खानगावच्या शेतकºयांनी पवार यांना शेतातील वाळलेल्या पिकांचा गुच्छ दिला.>अतिवृष्टीमुळे विदर्भात कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकºयांसह त्याची पाहणी करताना शरद पवार व आ. अनिल देशमुख.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019