शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विकासकांना प्रकल्प पूर्तीसाठी महारेराने दिलेल्या मुदतवाढीला न्यायालयात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 05:15 IST

प्रवर्तकांच्या फायद्यासाठी हजारो सदनिका खरेदीदारांना महारेराने वेठीस धरले आहे, असे याचिकाकर्ते सागर निकम यांचे म्हणणे आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मुंबई : ज्या नोंदणीकृत प्रकल्पांची मुदत १५ मार्च रोजी पूर्ण झाली, त्यांची वैधता आणखी सहा महिने वाढविण्याचा निर्णय १८ मे रोजी महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेशन आॅथॉरिटी (महारेरा)ने घेतला. यामध्ये पूर्ण करण्याचे प्रकल्प, सुधारित प्रकल्प तसेच ज्यांना आधीच मुदतवाढ दिली आहे, अशा प्रकल्पांचाही समावेश आहे. महारेराच्या या निर्णयाला एका सदनिका खरेदीदाराने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.काही डिफॉल्ट प्रवर्तकांच्या फायद्यासाठी हजारो सदनिका खरेदीदारांना महारेराने वेठीस धरले आहे, असे याचिकाकर्ते सागर निकम यांचे म्हणणे आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. निकम यांनी १२ जानेवारी २०१७ रोजी फ्लॅट विकत घेतला. त्याची ९५ टक्के किंमत प्रवर्तकाला त्याचवेळी दिली. डिसेंबर २०१७ मध्ये फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन प्रवर्तकाने दिले. मात्र, डिफॉल्टर म्हणून जाहीर केल्याने भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे फ्लॅटचा ताबा मिळू शकला नाही. परिणामी, भाड्याच्या घरात राहावे लागत आहे आणि आपले आर्थिक नुकसान होत आहे, असे निकम यांनी याचिकेत म्हटले.  २ एप्रिल रोजी महारेराने प्रकल्पांची नोंदणी वैधता तीन महिन्यांनी वाढविली. त्यानंतर आणखी तीन महिने वैधता वाढविण्यात आली आणि आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १८ मे रोजी ही वैधता आणखी सहा महिने वाढविण्यात आली. कायद्यानुसार, वेळेत फ्लॅट देण्यास अपयशी ठरलेल्या दोषी विकासकांना नुकसानभरपाई देण्यापासूनही सवलत देण्यात आली, असे याचिकेत आहे. मनमानी करीत मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ज्यांनी फ्लॅटसाठी पैसे गुंतविले ते कित्येक वर्षे घराचा ताबा मिळण्याची वाट पाहात आहेत. त्यामुळे महारेराचा हा बेकायदेशीर निर्णय रद्द करावा, अशी याचिकाकर्त्याची मागणी आहे.