शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

महाराष्ट्र दिन उत्साहात !

By admin | Updated: May 2, 2016 02:31 IST

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५६वा वर्धापन दिन रविवारी राज्यभर ठिकठिकाणी ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी झालेल्या लढ्याच्या स्मृतींना

मुंबई / नागपूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५६वा वर्धापन दिन रविवारी राज्यभर ठिकठिकाणी ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी झालेल्या लढ्याच्या स्मृतींना उजाळा देत राज्य शासनासह विविध पक्ष व संघटनांनी ठिकठिकाणी समारंभांचे आयोजन केले. विदर्भात मात्र वेगळा सूर उमटला. विदर्भवादी संघटनांच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. शिवसेना व मनसे यांनी या आंदोलनाला चोख उत्तर देत अखंड महाराष्ट्राचे झेंडे फडकविले.मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम झाला. त्या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर पोलिसांसह विविध दलांच्या पथकांच्या शिस्तबद्ध संचलनाची मानवंदना राज्यपालांनी स्वीकारली. मराठवाडा व विदर्भातील दुष्काळग्रस्तांच्या पाठीशीशासन ठामपणे उभे असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे, अशी ग्वाही राज्यपालांनी या वेळी केलेल्या भाषणात दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौकातील स्मारकास पुष्पचक्र वाहून संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले. विधान भवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह विधिमंडळ सचिवालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)अखंड महाराष्ट्रासाठी विदर्भात सायकल रॅलीविदर्भवादी संघटनांच्या वतीने वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडण्यात आले. माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी नागपुरात स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकावला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने काळा दिवस पाळून भाजपाच्या जाहीरनाम्याची होळी करण्यात आली. दुसरीकडे अखंड महाराष्ट्रासाठी शिवसेनेच्या वतीने अकोला शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. मराठा महासंघानेही स्वाक्षरी अभियान सुरू केले. आंदोलनांच्या या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.