शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अभय आपटे

By admin | Updated: January 6, 2017 22:18 IST

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदी अभय आपटे

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 6 - महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदी अभय आपटे, सचिवपदी रियाझ बागवान, उपाध्यक्षपदी विजयकुमार ताम्हाणे आणि चंद्रकांत मते यांची निवड झाली आहे. एमसीएने आज बोलाविलेल्या तातडीच्या बैठकीत एकमताने ही निवड करण्यात आली. न्या. लोढा समितीच्या शिफारशींनुसार, संघटनेत ९ वर्षे पूर्ण झालेल्या पदाधिकाऱ्यांना यापुढे पद भूषविता येणार नसल्याचा आदेश अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्या आदेशाची अंमलबजावणी करीत अजय शिर्के यांनी एमसीएचे अध्यक्षपद सोडले. सुधाकर शानभाग यांनी सचिवपदाचा तसेच धनपाल शाह आणि कमलेश ठक्कर यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्याजागी अनुक्रमे बागवान, ताम्हाणे आणि मते यांची निवड झाली आहे. ताम्हाणे हे पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचे सचिव असून यांच्या रूपात पीवायसीतील पदाधिकाºयांची प्रथमच एमसीएच्या मोठ्या पदावर निवड झाली आहे. एमसीएतील या ४ पदांसाठी आजच्या विशेष बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांबाबत एकमताने निर्णय झाला. शिर्के यांनी बैठकीनंतर याबाबत माहिती दिली. शिर्के म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालय आणि बीसीसीआय यांच्यातील वाद आता इतिहासजमा झाला आहे. त्यावर आणखी भाष्य करणे योग्य नाही. या घटनेतून खूप काही शिकण्यासारखे आहे. बीसीसीआयच्या उज्वल यशामध्ये शरद पवार, माधवराव सिंधिया, एन.के.पी साळवे, जगमोहन दालमिया यांचे योगदान मोठे आहे. एमसीएची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. यासंदर्भात अलीकडे आलेल्या बातम्या निराधार आहेत.’’एमसीएच्या या बैठकीला २६ पैकी २२ पदाधिकारी उपस्थित होते. अरूण जगताप, कमलेश ठक्कर, सचिन मुळे आणि प्रियंका थोरवे या बैठकीला अनुपस्थित होते. सचिवपदी निवड होण्याआधी रियाझ बागवान हे एमसीएच्या रणजी संघ निवड समितीचे तसेच स्पर्धा समितीचे अध्यक्ष होते. आता त्यांनी या दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे. या दोन्ही समितीच्या अध्यक्षांची नावे लवकरच जाहीर केली जाईल, असे बागवान यांनी ‘लोकमत’ला सांगितले.