शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Covid Update : महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी एक हजारहून अधिक नवे कोरोनाबाधित, सक्रीय रुग्णांची संख्या 5928 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 21:00 IST

महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे एक हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात गुरुवारी (13 एप्रिल) कोरोनाचे 1086 नवेन रुग्ण आढळून आले होते. तर एकाचा मृत्यू झाला होता. तसेच बुधवारी (12 एप्रिल) 1,115 नवे रुग्ण आढळून आले होते.

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. राज्यात शुक्रवारी (14 एप्रिल) 1152 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. यानंतर आता राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 5928 वर पोहोचली आहे. त्याचवेळी कोरोनामुळे चार जणांचा मृत्यूही झाला आहे. महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे एक हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात गुरुवारी (13 एप्रिल) कोरोनाचे 1086 नवेन रुग्ण आढळून आले होते. तर एकाचा मृत्यू झाला होता. तसेच बुधवारी (12 एप्रिल) 1,115 नवे रुग्ण आढळून आले होते.

गेल्या 24 तासांत 920 लोक रिकव्हर -महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या कोरोना बुलेटिननुसार, गेल्या 24 तासांत 920 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. याच बरोबर, 14 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात 80 लाख 126 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 98.11 टक्के एवढा आहे. या घडीला सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईत कोरोनाचे 1643 सक्रिय रुग्ण आहेत. तर ठाण्यात 1056 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत गेल्या 10 दिवसांतील कोरोना रुग्ण -- 4 एप्रिलला शहरात 218 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. कुणाचाही मृत्यू नाही.- 5 एप्रिलला शहरात कोरोनाचे 221 नवे रुग्ण सामोर आले. तसेच एकाचा मृत्यू झाला. - 6 एप्रिलला कोरोनाचे 216 नवे रुग्ण समोर आले आणि एकाचा मृत्यू झाला.- 7 एप्रिलला 276 नवे रुग्ण समोर आले आणि कुणाचाही मृत्यू नाही.- 8 एप्रिलला 207 नवे रुग्ण समोर आले आणि कुणाचाही मृत्यू नाही. - 9 एप्रिलला मुंबईत 221 नवे रुग्ण समोर आले आणि कुणाचाही मृत्यू नाही.- 10 एप्रिलला 95 नवे रुग्ण समोर आले आणि कुणाचाही मृत्यू नाही.- 11 एप्रिलला शहरात कोरोनाचे 242 नवे रुग्ण आढळले आणि कुणाचाही मृत्यू नाही. - 12 एप्रिलला मुंबईत 320 नवे कोरोना रुग्ण समोर आले.- 13 एप्रिलला मुंबईमध्ये 274 नवे कोरोना रुग्ण समोर आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस