शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Corona Update: चिंता वाढली! महाराष्ट्रात कोरोना स्फोट, गेल्या 24 तासांत तीन हजारहून अधिक रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 19:41 IST

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या 24 तासांत तब्बल 1956 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत...

राज्यात (महाराष्ट्रात) कोरोना संक्रमितांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 3081 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. तर 1323 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिलासादायक गोष्ट म्हणजे, आज राज्यात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. याच बरोबर, आता राज्यातील एकूण सक्रीय रुग्णांचा आकडा 13 हजार 329 वर पोहोचला आहे.

एकट्या मुंबईत 1956 नवे कोरोनाबाधित -देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या 24 तासांत तब्बल 1956 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. मुंबईतील हा आकडा पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढवणार आहे. दरम्यान मुंबईत 763 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी पोहोचले आहेत. एकट्या मुंबईत सक्रीय रुग्णांची सख्या अर्थात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 9191 एवढी आहे.

राज्यात गुरुवारीही 2,813 नवे कोरोनाबाधित समोर आले होते. गेल्या सुमारे चार महिन्यांतील एका दिवसात नोंदवली गेलेली ही कालची सर्वाधिक रुग्ण संख्या होती. दिलासादायक गोष्ट म्हणजे कालही कुठल्याही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. तसेच बुधवारीही राज्यात 2701 नवे कोरोनाबाधित आढळून आले होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई