शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने बिबट्यांच्या नसबंदीसाठी पुढाकार घ्यावा, सत्यजीत तांबे यांची मागणी

By योगेश पांडे | Updated: December 17, 2024 22:20 IST

Maharashtra Assembly Winter Session: एरवी महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभांमध्ये श्वानांच्या नसबंदीचा विषय चर्चिल्या जातो. मात्र मंगळवारी विधानपरिषदेत बिबट्यांच्या नसबंदीची मागणी उपस्थित करण्यात आली.

- योगेश पांडे नागपूर - एरवी महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभांमध्ये श्वानांच्या नसबंदीचा विषय चर्चिल्या जातो. मात्र मंगळवारी विधानपरिषदेत बिबट्यांच्या नसबंदीची मागणी उपस्थित करण्यात आली. बिबट प्रवण क्षेत्रातील हल्ल्यांचे प्रमाण पाहता नसबंदीबाबत कायदा करणे आवश्यक असून राज्य शासनाने तसा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी मागणी सत्यजीत तांबे यांनी केली.

औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्यांनी ही मागणी केली. अहिल्यानगर, पुणे, नाशिक जिल्ह्यांमध्ये राज्यातील अन्य भागात बिबट्यांची संख्या वाढत आहेत. मानवी वस्त्यांवर हल्ले धोकादायक ठरत आहेत. मागील पाच वर्षांत १४ हजार ४४२ हल्ले झाले व त्यात १४ हजार २४९ पशुधनाची हानी झाली. तर अनेक महिला, नागरिक व लहान मुलांचा मृत्यू झाला. २६ जून रोजी मी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन बिबट्यांच्या नसबंदीसाठी कायद्याबाबत विनंती केली होती. राज्य शासनाने प्रस्ताव पाठविला तर त्याचा सकारात्मक विचार करता येईल असे त्यांनी स्पष्ट केले होते. बिबट्यांवर नियंत्रणासाठी नसबंदी हा एकमेव पर्याय असून त्याचा सरकारने विचार करावा असे तांबे म्हणाले. ग्रामीण भागात शेतीला रात्री वीजपुरवठा होता. शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागते व त्यावेळीच जास्त हल्ले होतात. त्यामुळे असे हल्ले टाळण्यासाठी बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा वीजपुरवठा द्यावा. त्याचप्रमाणे अशा भागातील शेतकऱ्यांच्या शेती व घराला कुंपणासाठी अनुदानाची योजना आणावी, अशी मागणीदेखील तांबे यांनी केली.

टॅग्स :Satyajit Tambeसत्यजित तांबेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन