शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Speaker Election: राज्यपालांनी विधानसभा अध्यक्ष निवड कार्यक्रमावर सही करणे टाळले, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 19:19 IST

Maharashtra Assembly Speaker Election: काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. परंतू आम्ही लोकसभेला फॉलो करत असल्याने राज्यपालांनी या निवडणुकीस मंजुरी द्यावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.

सध्या सुरु असलेल्या विधानसभा अधिवेशनात अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून जोरदार हाललाची सुरु झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवाजी पद्धतीने निवडणूक घ्यायची आहे, तर भाजपाला मतदानाने. यामुळे 28 तारखेला होणाऱ्या अध्यक्ष निवडीवर महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आज राज्यपालांच्या भेटीसाठी गेले होते. 

काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. परंतू आम्ही लोकसभेला फॉलो करत असल्याने राज्यपालांनी या निवडणुकीस मंजुरी द्यावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. राजभवनावर नुकतीच शिष्टमंडळाने भेट घेतली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका राज्यपाल यांच्या सहीसाठी पाठवण्यात आली असून सही करण्याची विनंती केली आहे. मात्र, राज्यपालांनी यावर आपल्याला अभ्यास करण्यासाठी वेळ हवा असल्याचे म्हटले आहे. 

राज्यपालांच्या भेटीनंतर काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना याची माहिती दिली. शिष्टमंडळामध्ये थोरात, एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ होते. 'राज्यपाल यांना विनंती करण्यासाठी आलो होतो. त्यांनी निवडणूक कार्यक्रम पत्रिकेवर सही करून कार्यक्रम जाहीर करावा. पण त्यांना थोडा वेळ हवा आहे. त्यांना अभ्यास करायचा आहे.  मला अपेक्षा आहे की ते उद्यापर्यंत या कार्यक्रमाला मान्यता देतील आणि निवडणूक होईल, असे थोरात म्हणाले. 

राज्यपालांना निवडणूक कार्यक्रमाच्या पद्धतीवर, बदललेल्या नियमाविषयी अभ्यास करायचा आहे. काही तांत्रिक बाबींची माहिती घ्यायची आहे.  12 निलंबित आमदार किंवा विधानपरिषदेचे १२ आमदार यावर चर्चा झाली नाही. नियमात बदल केलेत त्याविषयी राज्यपालांना कायदेशीर दृष्ट्या अभ्यास करायचा आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीvidhan sabhaविधानसभाBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात