शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

मंत्रालयात मारलेली उडी नरहरी झिरवाळांना दिंडोरीत तारणार?

By धनंजय वाखारे | Updated: November 7, 2024 10:29 IST

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभेचे उपाध्यक्ष व पेठ-दिंडोरी मतदारसंघातील  अजित पवार गटाचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांना यंदाच्या निवडणुकीत आपल्याच माणसाशी अर्थात शरद पवार गटाच्या उमेदवार सुनीता रामदास चारोस्कर यांच्याशी कडवी लढत द्यावी लागणार आहे. 

- धनंजय वाखारेनाशिक - विधानसभेचे उपाध्यक्ष व पेठ-दिंडोरी मतदारसंघातील  अजित पवार गटाचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांना यंदाच्या निवडणुकीत आपल्याच माणसाशी अर्थात शरद पवार गटाच्या उमेदवार सुनीता रामदास चारोस्कर यांच्याशी कडवी लढत द्यावी लागणार आहे. 

पेठ-दिंडोरी विधानसभा मतदारसंघात यंदा १३ उमेदवार रिंगणात उभे असले तरी खरा सामना हा  नरहरी झिरवाळ आणि सुनीता चारोस्कर यांच्यातच आहे. बसपा, वंचित बहुजन आघाडीच्या  उमेदवारांसह सुशीला चारोस्कर व संतोष रेहरे हे शरद पवार गटातील बंडखोर अपक्ष उमेदवार     यांची मतविभागणी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडते, हे पाहणेदेखिल औत्सुक्याचे ठरेल. झिरवाळ यांनी निवडणुकीच्या तोंडावर धनगर आरक्षणासह पेसा भरतीसाठी मंत्रालयातील संरक्षक जाळीवर मारलेली उडी व शिंदेसेनेचे धनराज महाले यांनी ऐनवेळी घेतलेली माघार हे दोन मुद्दे झिरवाळांना कितपत तारतात, याची उत्सुकता असेल. ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

मतदारसंघातील कळीचे मुद्देपेठ-दिंडोरी मतदारसंघात आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आजवर आलेले अपयश.   दिंडोरी तालुक्यात तीन एमआयडीसी उभ्या राहत असताना पेठ तालुक्यात मात्र एमआयडीसी मंजूर होऊनही त्याबाबत प्रत्यक्षात कृती होऊ शकलेली नाही. त्यामुळे येथे बेरोजगारीचा मुद्दा नेहमीच चर्चिला जातो.  

मतदारसंघातील रस्त्यांची अतिशय दयनीय स्थिती झालेली आहे. याचबरोबर सिंचनाच्या सुविधांचाही प्रश्न नेहमीच प्रचाराचा मुद्दा राहिलेला आहे.  पेसा भरतीप्रश्नी शिंदे सरकारने काही प्रमाणात दिलासा दिला असला तरी सदर भरती ही मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात असल्याने हा मुद्दाही प्रचारात प्रभावी ठरू शकतो.     

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४dindori-acदिंडोरीNarhari Jhariwalनरहरी झिरवाळ