शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

By shrimant mane | Updated: November 1, 2024 08:07 IST

Maharashtra Assembly Election 2024 : नागपूर 'लोकमत'चे संपादक श्रीमंत माने यांनी पटोले यांच्याशी साधलेला हा संवाद. 

Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि  उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या भांडणामुळे एकाक्षणी तुटण्याच्या टप्प्यावर पोहोचलेली महाविकास आघाडी नंतर सावरली. काँग्रेस व उद्धवसेना यांच्यातील भांडणाचा फायदा शरद पवार यांनी उचलत जास्तीच्या जागा पदरात पाडून घेतल्या, असे बोलले जाते. या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेले पटोले म्हणतात, आता राऊतांशी कोणताही वाद नाही. आघाडी एकजूट आहे. बेरोजगारीवर हे सरकार बोलत नाही, पण आम्ही उद्योग, रोजगारनिर्मिती याबाबत सोल्युशनसह जनतेसमोर जात आहोत.  नागपूर 'लोकमत'चे संपादक श्रीमंत माने यांनी पटोले यांच्याशी साधलेला हा संवाद. 

प्रश्न : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीपूर्वी जाहीर करायला नको अशी भूमिका दोन्ही काँग्रेसनी घेतली. परंतु, काँग्रेसमधून तुमचा चेहरा पुढे केला जातोय, हा विरोधाभास नाही का? उत्तर : महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित करूनच निवडणुकीला सामोरे जायला हवे, अशी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका होती. आम्ही मात्र असे नको म्हणत होतो. त्यानंतर तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत अंतिमत: चेहरा निश्चित करण्याची गरज नाही असे ठरले. स्वत: उद्धव ठाकरे हेदेखील त्या गोष्टीशी सहमत झाले. या पृष्ठभूमीवर, आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असे प्रत्येकच पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे आपला नेता भावी मुख्यमंत्री व्हावा असे कार्यकर्ते बोलत असतील तर ते चालतच राहणार. परंतु, मु्ख्यमंत्रिपद हे आमचे लक्ष्य नाही. मुख्यमंत्री कोण हा विचार सध्या नाही. महाराष्ट्राचे पुरोगामित्व वाचविणे, शाहू-फुले-आंबेडकरांच्या वैचारिक वारशाला या सरकारने कलंकित केले आहे. महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांनादेखील या सरकारने अपमानित केले. असे कलंक असलेले महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेवरून घालविणे, हेच मविआचे लक्ष्य आहे. 

प्रश्न : तुमचा व संजय राऊत यांचा नेमका वाद काय होता? तुम्हा दोघांच्या भांडणामुळे महाविकास आघाडीचे नुकसान झाले असे वाटत नाही का?उत्तर : ही सगळी जागावाटपाची बोलणी व प्रक्रिया होती. आम्हा दोघांचा काही वैयक्तिक वाद नव्हता. आपल्या पक्षाला अधिक जागा मिळाव्यात, ही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मनातील भावना समजून घेऊन आम्ही आपापली बाजू मांडत होतो. कार्यकर्त्यांना असे वाटण्यात चुकीचे काहीही नाही. काही ठिकाणी दोन्ही पक्ष तुल्यबळ असल्यामुळे जागावाटपात पेच निर्माण झाला होता. ते जे काही पेच होते ते आम्ही चर्चेतून, मेरिटच्या आधारे सोडविले. आता काही वाद नाही. आम्ही एकजुटीने प्रचाराला लागलो आहोत. 

प्रश्न : बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रचार करताना तुम्ही केवळ महायुती सरकारवर ते गुजरातधार्जिणे असल्याचा आरोप करता, तर महाविकास आघाडीच्या काळातच उद्योग व रोजगारनिर्मितीत महाराष्ट्राची पीछेहाट झाली, असा आरोप महायुती करते. हा ब्लेमगेम कशासाठी? उत्तर : महायुती सरकारने महाराष्ट्र गुजरातला विकला हे केवळ आरोपासाठी आम्ही बोलत नाही. उद्योग, रोजगारनिर्मिती याबाबत सोल्यूशनसह आम्ही जनतेसमोर जात आहोत. वस्तुस्थिती मतदारांसमोर मांडत आहोत. बेरोजगारीच्या समस्येवर आमच्याकडे उत्तरही आहे. एमपीएससीच्या माध्यमातून युवकांना नोकऱ्या देण्याचा, पवित्र पोर्टलमधून होणारी लूट थांबविण्याचा शब्द आम्ही मतदारांना देत आहोत. छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविणे व वाचविणे हे आमचे ध्येय आहे. छत्रपतींच्या स्वप्नातील शेतकरी आम्हाला जपायचा आहे. त्यांच्याच स्वप्नातील सुरक्षा महिलांना द्यायची आहे. आम्ही महिलांना महालक्ष्मी बनविणार आहोत. त्यांना दीड-दोन हजार त्यांच्या हातावर टेकवून आम्ही थांबणार नाही. त्यासोबत महिलांना सन्मान द्यायचा, कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सुधारायची, महिला-मुली सुरक्षित राहतील हे पाहायचे. अगदी दोन-चार वर्षांच्या मुलीदेखील राज्यात सुरक्षित नाहीत. ड्रग्ज माफियांनी उच्छाद मांडला आहे. हे चित्र बदलायचे आहे. आताच्या सारखे लुटारू नव्हे तर प्रामाणिक सरकार द्यायचे आहे. 

प्रश्न : अशा मूलभूत समस्यांऐवजी आरक्षणासारखे मुद्दे अधिक चर्चेत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर रणकंदन माजले आहे आणि काँग्रेस पक्ष मराठा-ओबीसी वादात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी, दुटप्पी भूमिका घेतो, असे दिसून आले आहे. उत्तर : मराठा-ओबीसी वादात आम्ही दुटप्पी भूमिका घेतो हे खरे नाही. याबाबत आमची भूमिका वेगळी व व्यापक आहे. आधी जातनिहाय गणना व्हायला हवी. राहुल गांधी हीच भूमिका मांडत आहेत. येत्या सहा तारखेला मुंबईत शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राहुलजी गॅरंटी जाहीर करतील. तेव्हा याच भूमिकेचा पुनरूच्चार केला जाईल. जेणेकरून प्रत्येक समाजाची नेमकी आकडेवारी समोर येईल आणि त्यातून प्रत्येकाचे आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण स्पष्ट होईल. कोणत्या जातींना अधिक मागास आहेत हे कळेल. अगदी ओबीसींमधील काही जाती अजूनही अतिमागास आहेत. त्यांचा विचार करावा लागेल. म्हणून आम्हाला नुसती जनगणना नको आहे. गणना तर जंगलातील पशुपक्ष्यांचीही होते. तशी गणना नव्हे तर आम्ही जातगणना करणार आहोत. 

प्रश्न : इतके सगळे स्पष्ट आहे तर मग सीईसी बैठकीत राहुल गांधी महाराष्ट्रातील नेत्यांवर का रागावले होते?उत्तर : समाजातील प्रत्येक घटकाला, विशेषत: वंचित घटकांना नेतृत्वाची संधी मिळावी, अशी राहुलजींचे म्हणणे होते. माझीही हीच भूमिका आहे. यावेळी अनेक ठिकाणी तशी संधी देणे शक्य झालेले नाही. म्हणून सरकार आल्यानंतर अशा वंचित समाजाला विविध स्तरावर नेतृत्वाची संधी देणार आहोत. त्यासाठी विशेष कार्यक्रम राबविला जाणार आहे.

प्रश्न : काँग्रेस व उद्धवसेना आपसात भांडत राहिली आणि त्याचा लाभ शरद पवारांनी घेतला. काँग्रेसच्या वाट्याला अपेक्षेपेक्षा कमी जागा आल्या आणि पवार गटाने प्रमाणापेक्षा अधिक जागा पदरात पाडून घेतल्या, असे झाले का? उत्तर : असे काहीही घडलेले नाही. काँग्रेस व उद्धवसेनेचे भांडण वगैरे काही नव्हते आणि त्याचा लाभ शरद पवारांनी उचलला हेदेखील खरे नाही. तिन्ही प्रमुख पक्ष तसेच मित्रपक्षांना दिलेल्या जागांचे संपूर्ण वाटत मेरिटवर, उमेदवार निवडून येण्याच्या क्षमतेवर झालेले आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nana Patoleनाना पटोले